स्वप्नात माझ्या...
स्वप्नात माझ्या...




स्वप्नात माझ्या एका
मीच स्वतःस भेटले
काय वृत्तांत ऐकावा
मीच काहीशी बिथरले
स्वप्नांचा सुंदर बेत रंगला
माझ्यासंगे खेळ केला
काय महिमा ऐकावा
मलाच हादरून गेला
रंभेसमान मी सौंदर्याची
खान जणू साजरी गोजरी
काय कथासार ऐकावा
मीच माझ्यात हरवले
स्वप्नातला राजकुमार
पुढ्यात उभा चंद्रासमान
काय संवाद ऐकावा
हरखून गेला खुळा
प्रेमाला सुरुंग लागला
खरा साथी गवसला
काय पोवाडा ऐकावा
दोघांचा झाला सोहळा