स्वप्नात माझ्या स्वप्न सजवले
स्वप्नात माझ्या स्वप्न सजवले
1 min
773
स्वप्नात माझ्या तू गवसली
स्वप्नात माझ्या तूच हरवली
स्वप्नात माझ्या स्वप्न तुझे मी
न विसरता स्वप्नात सजवले
स्वप्नात माझ्या अलगद ये
लाडात जरा हळूच जवळ घे
प्रेमाचे हितगुज कुजबुजून घे
स्वप्नाला हकीकतीचे सुख दे
स्वप्नात माझ्या थांब ना जरा
बघ स्वतःला माझ्यात एकदा
धोक्याचा लवलेश त्यात नाही
फक्त तुझा प्रेमळ ध्यास आहे
स्वप्नात माझ्या निराशा नको
प्रेमाचा देखावा कधीच नको
साथ आपली हवी कायमची
अपेक्षांच्या विळख्याविना
