AnjalI Butley

Others

4.3  

AnjalI Butley

Others

स्वप्नांजली

स्वप्नांजली

3 mins
302


माझी स्वप्न मोठी मोठी आहेत माझ्या मोठ्या मोठ्या डोळ्यांनी बघीतलेली! सपना तीच्या स्वप्नांबद्दल सांगत होती! सुंदर गोरी निळ्या डोळ्यांची! स्वप्न तर प्रत्येक जण बघतात पण माझी स्वप्न मोठी आहे!

दर आठवड्याला नविन कपडे, मॅचिंग शुज, चप्पल, बाहेर आऊटिंगला जाणे, सिनेमा, मित्रमैत्रिणींसोबत पार्टी, असे ठरलेले, मी कमवणारा पैसा माझा आहे व मी तो कसा खर्च करणार हे मी ठरवणार, असा आग्रही स्वभाव.

लहानपणा पासून हातात पॉकीटमनी म्हणून भरपुर पैसा हातात असायचा! मैत्रिणी मित्र भरपुर! 

लहानपणी स्वप्न बघितलेले मोठ्या राजवाड्यासारख आपले घर असणार! टापटीप राहणी, खूप शिकून मोठे व्हायचे! कधी पोलीस बनायचे तर कधी डॉक्टर बनायचे तर कधी शिक्षक असे बदलत राहणारी काही स्वप्न होती! 

सपना आज वेगळ्याच मुड मध्ये होती. कालच तीचा १८वा वाढदिवस झाला, लग्न करण्यासाठी आता काही अडचण नाही, असे मनात बोलत होती, तीने तीचा स्वप्नातील राजकुमार २ वर्षापुर्वीच हेरला होता व तीला त्याच्याशीच लग्न करायचे होते! राजकुमाराला आपल्या मनातली इच्छा अजुन सांगितली नव्हती! सांगणार तरी कसे तो तीच्यापेक्षा १० वर्षाने मोठा होता, त्याचे नाव नील, नील श्रीमंत घरचा बडे बाप का बडा बेटा! उनाड... दिसायला छान, त्याला सपना आवडायची पण तो उनाड, आज ही मुलगी तर उद्या दुसरी, सपना वयाने छोटी व अनुभवाने पण कमी अनुभव होता अश्या श्रीमंत बापांच्या मुलांबरोबर राहण्याचे, 

स्वप्न मोठी होती सपनाची पण ती पुर्णत्वास नेण्यास लागणारे खाच खळगे तीला माहित नव्हते, अल्लड होती... ती नील सोबत लग्न करण्याचे स्वप्न बघीतले होते. तीने ठरवलेल्या नात्याला स्वप्नाली नाव दिले होते! हे एक तर्फी नात होत! नील, सपना आपल्या प्रेमात पडली आहे हे माहित होत, तो तीच्या सोबत वेळही घालवत होता, पण लग्न करण्यासाठी सपना त्याची पसंती नव्हती, मजा ठीक आहे, पण त्याच्या घरच्यांना ती पसंत पडणार नाही हे त्यानेच ठरवले! 

सपना एकदा त्याच्या सोबत त्याच्या घरी गेली, पण त्याचे घर तो सांगत होता तसे मोठेही नव्हते व टाप टीप ही नव्हते. तीचा मुड अॉफ झाला.. त्याच्या घरी जवळपास वीस माणसे होती लहान मोठी धरून..

 एवढ्या मोठ्या गराड्यात कसे रहणार, परत काकू बाईसारख मुलगी म्हणून घरीच राहयचे! हे त्याच्याघरी गेल्यावर व घरातील बायकांना बघून तीला जाणवले.

जे स्वप्न बघत होतो ते प्रत्यक्षात तसे काही नील सोबत लग्नकरून सत्यात उतरणार नाही... खूप वाईट वाटले तीला, नील पण तीच्याशी जरा जास्तच हुकमत दाखवत होता, हे असे करायचे, हे तसेच करायचे! लग्नाच्या ज्या बालिश कल्पना सपनाच्या होत्या त्या पुर्ण होतील हे तीला आता वाटत नाही, ती एकटी एकटी राहायची. आपल्या स्वप्नाचा चुराडा झाला असे सारखे मनात म्हणत होती. 

नीलला त्याचे काहीच वाटत नव्हते, कारण तो तीच्यात तेवढा गुंतलाच नव्हता.. तो लागलीच दुसर्या मुलीं बरोबर वेळ घालवायला लागला!

सपना दुःखी झाली, मुड बदलण्यासाठी ती युरोपया सहलीला जायचे ठरवते व जाते, तसेही आता कोणी आपले म्हणणारे राहिलेले नाही, जशी नको असलेल्या गोष्टीवर तीलांजली वाहतो तशी मी स्वप्नांजली वाहते... परत नविन चांगली स्वप्न बघण्यासाठी!

युरोपच्या बर्फाळ थंडीत पर्यटक बनून रोज नविन पर्यटनस्थळे, नविन लोक भेटल्यावर नविन उर्जा नविन स्वप्न बघत सपना एक महिन्यानी परत आली, ती भारतात भंटकंती करून आदिवासी मुलांना शिकवण्यासाठी ग्लोबल सिटिझन सपोर्ट टू लोकलस् ह्या एनजीयोला जॉईन झाली. 

आपले आधी दुसरे कोणते तरी स्वप्न बघत होती ते पार विसरली...  



Rate this content
Log in