स्वभावाला औषध नसत
स्वभावाला औषध नसत
'स्वभावाला औषध नसत' असही म्हणतात, की स्वभाव नैसर्गिक असतो.तो बदलवता येत नाही म्हणूनच ही म्हण कदाचित रुढ असावी .पण स्वभावात बदल करता येतो. ही गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे.काही लोक सतत शंका कुशका करत असतात.मुळात तो त्यांच्या विचाराचा दोष असतो. असल्या वृत्तीमुळे त्यांना दुसऱ्यांचे गुण दिसतच नाहीत.ती लोक फक्त नकारार्थीच विचार करतात. आणि आपली छबी त्यांना सतेजच दिसते.आपल्या पेक्षा कोणीच लायक नाही. अतिशय बुद्धिमान कर्तृत्ववान या जगात माझ्यासारखा कोणीच नाही. अस त्यांचा मानस असतो.या सर्व वागणुकीमुळे त्यांच कितीतरी नुकसान होत असते.याचा कधीच त्यांना विचार येत नाही.
अश्या व्यक्ती प्रत्येकात वाईटच गुण पहातात.अश्या स्वभावामुळे चांगले लोक आपल्यापासून दुर जातात.याच ही कारण त्यांच्या जवळ असतं.याउलट प्रत्येकांमध्ये वाईट चांगले गुण राहू शकतात हा विचार त्यांना शिवतसुद्धा नाही.आणि काही चांगल्या गोष्टीला ते मुकतात . जी व्यक्ती दुसऱ्यां मध्ये चांगलेच गुण शोधत असतात.त्यांना काहीतरी नविन मिळतच असतं.दोन्ही व्यक्ती मध्ये फारच अंतर असते. त्यामुळे काय होत एक नकारार्थी व्यक्ती जवळ दुसरे नकारार्थी लोक जमा होतात. तश्याच स्वभावाची लोक त्यांच्या जवळ आकर्षित होतात. जे व्यक्ती सकारार्थी असतात,त्यांच्याजवळ सकारार्थी विचारांचीच लोक जमा होतात.तशीच लोक आकर्षित होतात. विचारात खुप मोठी शक्ती असते.आपण कसा विचार करत असतो.या एका गोष्टीवर आपले भविष्य अवलंबून असते.
एक नविन पाव्हणा गावात आलेला होता. तो त्या गावाबद्दल गावातल्या लोकांबद्दल माहिती विचारत होता.त्या पाव्हण्याने रस्त्यात भेटलेल्या माणसाला गावातल्या लोकांविषयी माहिती विचारली. तेंव्हा तो गृहस्थ सांगू लागला.या आमच्या गावातील लोक, फारच वाईट आहेत,काही विचारुच नका!नको तिथ नाक खुपसतात.अस राजकारण आहे, या गावात एकाचाही स्वभाव धड नाही.या लोकांना कोणाच काही सुख बर दिसत नाही. दुसऱ्याच्या सुखात विष कालवण्या पलिकडे काही दिसत नाही. त्या माणसाच बोलने झाल्यावर पाव्हणा पुढे निघाला.
पुन्हा दुसरा व्यक्ती भेटला.पाव्हण्याने त्यालाही तोच प्रश्न विचारला. का हो तुमच्या गावातिल लोक कशी वागतात..? तोे गृहस्थ सांगू लागला या आमच्या गावातील लोक खुपच चांगले आहेत सज्जन आहेत एकमेकांच्या मदतीला नेहमीच तयार असतात सर्वजन मिळून मिसळून राहतात एकमेकांच्या मदतीला नेहमीच तत्पर असतात इथे कोणी खोट बोलत नाहीत.दुसऱ्याविषयी वाईट बोलत नाहीत,वाईट चिंतत नाहीत.सगळीकडे कौटुंबिक वातावरण आहे. कोणत्याही व्यक्ती वाईट नसतात.आपल्या बघण्याचा दृष्टीकोन वाईट किंवा चांगला असतो.दोष त्या व्यक्तीमध्ये नसतो.चांगल्यांना चांगल मन असल की सर्व जग चांगल दिसतं आणि 'स्वभाव हा नैसर्गिक असतो'. स्वभावाला औषध नसतं.परंतू 'स्वभावात बदल घडवून आणता येतात'. हे प्रथमत: आपण स्विकारायला पाहिजे.आपण स्वत: ला वेळ दिला पाहिजे.आपल्या मनात कश्या प्रकारचे विचार येतात हे आधी समजायला हवे.आपल्याला कोणते विचार अस्वस्थ करतात.किंवा आपणास कोणत्या गोष्टी पासून चीड वा घृणा आहे.हे आधी समजणे जरुरी आहे.
सुरवातीला आपण स्वत:ला शांत एकाग्र करायचे.नंतर ज्या गोष्टींचा आपण तिरस्कार करतो.किंवा विचलित होतो.त्या विचारांपासून आपल्या मनाला दूर करायचे.आणि ज्या गोष्टीं चांगल्या आहेत.त्या बाबींवर लक्ष केंद्रीत करायच. जोपर्यंत आपण ठरवत नाही,तो पर्यंत कोणी ही आपली मदत करु शकत नाही. कोणी ही आपणास आनंदी करु शकत नाही.आपण फक्त एकच विचार करायचा.मी खरच आनंदात आहे काय.? दुसऱ्यांमध्ये मला दोष का आढळतात.मी दोषच कां शोधत असतो.?स्वत:शीच प्रश्न करायचा.मी ताच्यांत वाईट का बघत असतो.जर वाईटच शोधतो तर मग मला आनंद कां होत नाही.?आतल मन मला डिवचत कां रहाते.?मी पण वाईट वृत्तीचा आहे काय.? तेंव्हा तुम्हाला तुमच्या प्रश्नांचे आपोआपच उत्तर मिळेल!
आपण जसा विचार करतो,तश्याच घटना आपण आपल्याकडे आकर्षित करत असतो.म्हणून गुण शोधावे.त्या गुणांचा स्वत:लाही फायदा होईल.आणि बऱ्याच प्रमाणात आपल्यात बदल येतील.नवनविन गोष्टी शिकायला मिळतील याशिवाय दुसऱ्यांकडे पाहण्याच्या दृष्टिकोणातही बदल पडेल. आपणहून आपण दुसऱ्याची प्रतिष्ठा जपायला लागू.आणि दुसऱ्यां व्यक्ती तुमची प्रतिष्ठा जपतील.जसे तुम्ही दुसऱ्यांसोबत वागाल,इतर ही तुमच्यासोबत वागतील. दुसऱ्यांकडून मानसन्मान मिळावा अस जर वाटत असेल तर जर आपणही त्यांना मानसन्मान दिला पाहिजे. आपल्या ताल्याच्या चाब्या आपल्याचकडे असतात. दुसऱ्यांच्या खिश्यात नसतात.आपण आनंदी तर सर्व जग आनंदी.असा आनंद स्वत:तून प्रफुल्लीत करावा व आनंद मिळवावा..!!!