Click here to enter the darkness of a criminal mind. Use Coupon Code "GMSM100" & get Rs.100 OFF
Click here to enter the darkness of a criminal mind. Use Coupon Code "GMSM100" & get Rs.100 OFF

Sunita madhukar patil

Others


5.0  

Sunita madhukar patil

Others


सवाष्ण

सवाष्ण

3 mins 614 3 mins 614

दारी सुंदर तोरण , शेणसडा , रांगोळी , सगळीकडे फुलांच्या सुगंधाची दरवळ , अशा या प्रसन्न वातावरणात गीताताईंचा उत्साह अगदी ओसंडून वाहत होता...त्या खूप खुश होत्या... कारण ही तसचं होत...आठ - नऊ वर्षाच्या प्रदीर्घ काळानंतर त्यांच्या घरी नातवाच आगमन झालं होतं...म्हणूनच त्यानीं आज सत्यनारायणाच्या कथेचा घाट घातला होता...आणि त्या निमित्ताने आज त्यांच्या घरी सवाष्ण भोजनाचा देखील कार्यक्रम होता...तयारी अगदी जय्यत चालू होती...


मुहूर्तावर पूजा निर्विघ्नपणे पार पडली...सवाष्ण भोजनाची तयारी सुरू झाली... पण त्यांनी आमंत्रित केलेल्या आकरा बायकांपैकी फक्त दहाच सुवासिनी आल्या होत्या...एकजण आली नव्हती आणि येणार नाही म्हणून निरोप पाठवण्याची तसदी देखील तिने घेतली नव्हती...आता काय करायचं ...गीताताई टेन्शन मध्ये आल्या...कोणीतरी सुचवलं नऊ जणींना जेवू घाला...पण गीताताई ऐकायला तयार नव्हत्या...दहा पैकी कोणाला नको म्हणून सांगायचं हा प्रश्न होताच शिवाय त्यांचा आकरा सवाष्णीचा नवस होता...आता काय करायचं...


त्यांनी काहीतरी विचार करून शोभाला आवाज दिला...शोभा त्यांचा घरी धुणं , भांडी धुवायचं काम करायची आणि तिला बोलल्या " शोभा चल हात, पाय धुवून या आसनावर येऊन बैस...


"अहो पण बाईसाहेब "


"पण नाही आणि बिन नाही चुपचाप इथे येऊन बैस..."


सगळेच आश्चर्याने गीताताईंकडे पाहू लागले...इतरवेळी देवधर्म , सोवळं-ओवळ , कर्मकांड या मध्ये अडकलेल्या गीताताई अचानक शोभाला सुवासनीच्या आसनावर बसवतील याची कोणालाही कल्पना नव्हती...सगळ्यांसाठी हा आश्चर्याचा धक्का होता...शोभाही थोडी बावरून गेली...त्यांच्या स्वभावाशी तीही अवगत होतीच...त्या खूप रागीट होत्या... सगळ्या गोष्टी कशा अगदी वेळेवर जागच्या जागी त्यांना लागायच्या... रोज देवपूजा केल्याशिवाय स्वतःला कोणाला स्पर्श ही त्या करू देत नव्हत्या... घरच्या लोकांसाठी वेगळी भांडी आलेगेल्यांसाठी वेगळी... खुप वेगवेगळ्या कर्मकांडात त्या अडकलेल्या होत्या...म्हणून सगळ्यांसाठी हा कुतूहलाचा विषय होता...


" पण बाईसाहेब मी उपवास नाही केला " शोभा बोलली...


" अगं घडला तुझा उपवास , उपवास म्हणजे तरी काय गं...उप म्हणजे जवळ आणि उपवास म्हणजे देवाजवळ वास करणे , सकाळ पासून तुझी ही जी पूजेच्या तयारीसाठी धावपळ चालू आहे हे कशासाठी त्या परमेश्वरासाठीच ना ? अगं तूच खऱ्याअर्थाने त्या परमेश्वराजवळ वास करते आहेस आणि तो तुझ्यात... आणखी काय हवं गं...अगं तुझ्या सारख्या कष्टाळू , प्रामाणिकपणे काम करणाऱ्या स्त्रीचे आशीर्वाद जर माझ्या नातवाला मिळाले तर चांगलच होईल... आणि बाळाच्या जन्मापासून तु त्याचं ही कसं अगदी मन लावून सगळं करत आहेस ते माझ्या नजरेतून सुटलं नाही शोभा...म्हणून म्हणतेय चलं ये इकडे...


शोभा थोडी घाबरतच जाऊन आसनावर बसली...आणि हसतखेळत जेवण पार पडली...शोभाच्या चेहऱ्यावर एक वेगळचं समाधान होतं आणि डोळ्यात अश्रू ...आणि गीताताईंना शोभाकडे पाहून जाणवलं की देव त्यांच्याकडून बघून हसतोय आणि त्यांना भरभरून आशीर्वाद देतोय...त्यांच्याही चेहऱ्यावर रोजच्या चाकोरीबद्ध कुंठीत विचारानां तिलांजली देऊन एक नवी दिशा एक नवीन मार्ग गवसल्याच समाधान होत...


जात पात , उच्च-नीच , गरीब - श्रीमंत या पलीकडे जाऊन एक माणूस म्हणून शोभाला दिलेला मान आणि बदलत्या काळानुसार केलेलं मत किंवा विचार परिवर्तन हे सगळं बघून माझ्या मनात गीताताईंबद्दलचा आदर आणखीनच वाढला...


परमेश्वर हा सगळ्यांचाच उध्दार करीत असतो त्याच्या दारी भेदभाव चालत नाही ...यासाठी मला तुकोबारायांच्या एका अभंगाचा उल्लेख करावासा वाटतो...


विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म।


भेदाभेद भ्रम अमंगल।।


अईका जी तुम्ही भक्त भागवत।


कराल ते हित सत्य करा।।


कोणा ही जिवाचा न घडो मत्सर।


वर्म सर्वेश्वर पूजनाचे ।।


तुका म्हणे एक देहाचे अवयव।


सुख दु:ख जीव भोग पावे।।Rate this content
Log in