Madhuri Sharma

Others

4.0  

Madhuri Sharma

Others

संशय

संशय

1 min
213


  रचना आणि माझी ओळख शाळेत झाली होती. तेव्हापासून आतापर्यंत आम्ही चांगल्या मैत्रीणी होतो‌. नेहमी फावळा वेळ आम्ही एकमेकांसोबत घालवत असु. आम्ही दोघी एकमेकांसोबत काहीच लपवत नसू. अचानक तिचं लग्न ठरलं. काही दिवसांनी ती तिच्या सासरी जाणार होती. ती सतत तिच्या होणाऱ्या नवऱ्याबद्दल काही न काही सांगत असायची. त्याने फोनच केला नाही. तो कदाचित दुसऱ्या मुलीवर प्रेम करतो आणि माझ्यापासून हे सर्व लपवतोय असं भरपूर संशयास्पद ती नेहमी बोलायची. आणि हळूहळू तिची संशय घेण्याची प्रवृत्ती इतकी वाढली की तिने त्या मुलांसोबत लग्न करायलाच नकार दिला. 

     असंच आज अनेक वर्षांनी ती मला भेटली थोडीफार विचारपूस केल्यानंतर तिने स्वत:नेच त्या मुलाचा विषय काढला आणि म्हणाली काजल अगं तो मुलगा फारच चांगला होता मी उगाच त्यांच्यावर संशय घेतला. मी नकार दिल्यानंतर त्याचं स्थळ माझ्या मामाच्या मुलीसाठी आलं तिने होकार दिला आणि लग्न झालं. त्या दोघांचा आता सुखी संसार चालु आहे. 

   रचनाला आता पश्र्चाताप होत होता पण आता काय फार उशीर झाला होता.

 म्हणुन कधीही आयुष्यात आपल्याला कोणाचा संशय आलाच तर आधी त्याची योग्य ती शहानीशा करूनच मग काय तो योग्य निर्णय घ्यावा. नाहीतर मग रत्नाला जसं पश्र्चाताप झाला तसं मग आपल्या हाती काहीच उरत नाही.

धन्यवाद.....


Rate this content
Log in