समुपदेश...
समुपदेश...


देशपांडे काका नेहमी प्रमाणे आज ही गार्डन मध्ये फिरायला सकाळीच निघाले फिरताना त्यांना झाडावर माकड दिसले "आज आलात तुम्ही" काका म्हणाले आणी पुढे चालु लागले तेवढ्यात त्यांना कोणी हाक मारल्याचा आवाज आला त्यांनी वळुन पाहिले तर तेथे कोणीच नव्हते म्हणून ते पुढे परत चालु लागले. परत हाक आली म्हणून ते थांबले आणी पाहु लागले तर झाडावर बसलेले माकड काकांना म्हणाले" काका आम्ही हाक दिली"" तुम्ही आमचे पुर्वज पण तुम्ही बोलता." "काका आम्ही प्रसिद्ध तीन माकडे तुमचे कौतुक करायला आलोय" "कौतुक ते कशासाठी काका तुम्ही इथे फिरायला येता पण चांगले समु पदेश ही देता जसे वाईट पाहू नये त्या दिवशी तुम्ही त्या प्रेमीयुगुलांना कसे समजावले की ह्या गार्डनमध्ये लहान मुलंही येतात त्यावर वाईट परिणाम होऊ देऊ नका."
"दुसरा माकड म्हणाला काका मी कसे सांगतो वाईट ऐकू नये ते ही तुम्ही नेहमी मुलांना सांगता" "त्या दिवशी दोन मुल भांडत होती त्यात एकाने दुसऱ्याला शिवी दिली तर त्याला तुम्ही कसे समजावत सांगितले की वाईट बोलुन नये खरंच काका तुम्ही चांगले कार्य करत आहात पण आम्ही तुमच्याबरोबर बोललो हे मात्र तुम्ही कोणाला सांगू नका
"काकांनी घड्याळाकडे पाहिले व म्हणाले" बरं बरं मी आता निघतो माझी पत्नी चहासाठी माझी वाट पाहत असेल परत नक्की भेटू या...