The Stamp Paper Scam, Real Story by Jayant Tinaikar, on Telgi's takedown & unveiling the scam of ₹30,000 Cr. READ NOW
The Stamp Paper Scam, Real Story by Jayant Tinaikar, on Telgi's takedown & unveiling the scam of ₹30,000 Cr. READ NOW

Varsha Shidore

Others

3  

Varsha Shidore

Others

सकाळची झोप

सकाळची झोप

1 min
833


रात्र माझी मस्तीत जाते 

अगदी परीच्या कथेसारखी 

सकाळ झोप झोप म्हणते 

सुट्टीच तर आहे कर मजा 


थंडगार वारा लोळायला 

रोजच पाडतो भाग मला 

थंडी माझी आवडती राणी 

जिची मी राजकुमारी न्यारी 


झोपेचा मोह नाही आवरत 

दिवसभर करणार काय 

मग झोपेशी जमते गट्टी 

ती खुशाल घेते कवेशी 


सकाळी माझ्या नावाचा 

आगडोंब चाले मोठा 

सगळयांचे आळशीपणाचे 

मलाच का हो धडे 


आता ठरवले उठणार लवकर 

पक्षांची किलबिलाट बघणार 

बागेतल्या पाखरांशी खेळणार 

घरात सगळ्यांना मदत करणार 


पुस्तकांची फार आवड मला 

चित्रांचा खेळ खूप भावतो मला 

सायंकाळ मित्रांसोबत घालवणार 

आनंदीआनंदात उद्याची वाट पाहणार 


Rate this content
Log in