साथ दे तू मला
साथ दे तू मला

1 min

757
पडद्याआड गेलेल्या आशेला
स्वतःत डोकावता यावं असं
माणूस म्हणून शोध माणसाला
हे माणसा... साथ दे तू मला
विश्वासाचं मिळावं दान
ओळख असावी प्रभावी
माणसाची वागणूक न्यारी
हे माणसा... साथ दे तू मला
बोलण्यात असावी चतुराई
शब्द असावेत मोजून मापून
मन दुखावणारे नसोत बोल
हे माणसा... साथ दे तू मला
माणूस माणसात मला असा
माणसापायी शोधायचाय
जो कळेल माणसालाही
हे माणसा... साथ दे तू मला