सांता बाबा
सांता बाबा
रंगेबेरंगी सजावटीने घर सजले होते घरात गोड धोड पदार्थ बनवण्यात वाझ कुटुंब व्यस्त होते छोटा जॉन तर नाताळ येणार म्हणून खूप खुश होता कारण हि तसेच होते दरवर्षी प्रमाणे यंदा हि त्याला सांता बाबा भेटून भेटवस्तू देणार होता आणि तो दिवस उजाडला
रात्री १ वाजेपर्यत डोळ्यात तेल घालून जॉन सांता बाबा ची वाट पाहत होता नेहमी बारा वाजता भेट वस्तू देऊन "आता झोपी जा" म्हून सांगणारा सांता आज का आला नाही त्याने हजार प्रश्न आपल्या आई वडिलांना केले त्यानी त्याला खूप समजावले कि "तो ट्रॅफिक मध्ये असेल तू झोपी जा तो आला कि आम्ही उठवतो" पण जॉन'काही ऐकायला तयार नव्हता आपण सांता बाबा ला भेटल्याशिवाय झोपणार नाही हाच अट्टहास धरून बसला त्याचे डोळे हि भरून आले तसा तो लहान त्यामुळे रडून रडून झोपी गेला आणि त्याच्या आई बाबा नि सुस्कारा सोडला
दुसऱ्या दिवशी नाताळ निमित्त सगळे तयार होते पण जॉन मात्र हिरमुसला होता परत त्याच सुरु झालं आता मात्र त्याला कसे समजवायचे हेच त्याना कळे ना सगळ्यांना त्याचे ते रडणे पाहून वाईट वाटत होते पीटर म्हणजे जॉन चे बाबा ह्यच्या डोळ्यसमोर तो दिवस आला नेहमी प्रमाणे मॉर्निंग वॉल्क करण्यासाठी त्याचे बाबा म्हणजे मिस्टर वाझ जात त्या दिवशी हि ते गेले पण ते घरी न येता एक फोन आला कि त्याचे अकॅसिडेन्ट झाले आहे सगळ्यांनी हॉस्पिटल मध्ये धाव घेतली ते बेशुद्ध होते काही तासात ते शुद्धी वर आले पण त्यांना पायानी साथ दिली नाही त्याचे दोन्ही पाय ट्रक च्या खाली गेल्याने ते निकामी झाले होते हे जेव्हा सगळयांना कळले तेव्हा तर सगळयांच्या पायाखालची जमीन सरकली मिस्टर वाझ हि हतबल झाले पण घरातल्यानी त्यांना आधार देत समजूत काढली पण त्याच मन कुठे तरी दुसऱ्यावर अवलूंबन राहावं लागेल हेच खुणावत होत त्याचे दुःख छोट्या जॉनला लहान असल्यामुळे जाणवत नव्हते आणि आज त्याच्या अट्ठाहास हि वेगळा होता त्याला कोण समजवणार होत कि दर वर्षी १२ वाजता भेट वस्तू घेऊन येणारा सांता आणि कोणी नसून त्याचे आजोबा होते जे सांता बाबा ची वेशभूषा करून त्याच्या नातवाच्या आवडीच्या भेट वस्तू देत जे ते आता करू शकत नाही कारण दुर्देवाने ते अंथरुणाला खिळले होते आणि जॉन च्या रडण्याने ते अजून हतबल झाले होते
मारिया म्हणजे जॉन च्या आईने पीटर ला सावरले तसे त्यांना त्याचे बाबा बोलवतात असे सांगण्यात आले पीटर रूम मध्ये गेला बाबा नि त्याला जवळ बोलून काहीतरी सांगितले तसे तो उठला समोर च्या कपाट उघडले व त्यात असलेला एक बॉक्स घेऊन बाहेर येत जॉन कडे पाहत म्हणला "अरे जॉन आता आजोबानी सांगितले कि तू झोपला तेव्हा सांता बाबा येऊन गेला तुला कसं उठवणार म्हूणन आजोबा कडे हि भेट वस्तू देऊन केला "
हे ऐकताच जॉन पटकन म्हणला "काय "?
"हो "
"हे घे "
बॉक्स हातात घेताच रडका चेहेरा खुलला तो पळत आजोबा कडे गेला आणि विचारू लागला "तुम्ही मला का नाही उठवला ग्रँड पापा "?
"अरे कसं उठवणार त्याला घाई होती खूप लहान मुलाना भेट वस्तू देण्याची आणि तो काय गाडी ने येतो कि लवकर पोहोचेल अरे त्याची हरणाची गाडी हरण पळतील तेव्हाच तो लवकर पोहचले "
"हो ना जॉन आजोबा बरोबर सांगतात पण हा त्यांनी मात्र पुढच्या वर्षी तुला नक्की भेटण्याचं सागितले "
"काय खरंच "
"हो "
त्याच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहतो तो पाहून अंथरुणावर खिळलेल्या आजोबानी आपल्या वेदना काही क्षणा साठी विसरून गेले आणि पुढील वर्षी पीटर याला सांता बाबा बनण्याचे गुपित जॉन पासून लपवून ठेव म्हणाले
