akshata alias shubhada Tirodkar

Others

3  

akshata alias shubhada Tirodkar

Others

रवी आला डोई वरती

रवी आला डोई वरती

2 mins
352


"हुश्श काय हे ऊन आणि किती प्रखर सूर्यकिरणे नको झालं आज "

"आला तुम्ही सांगितले होते भर उन्हात नका जाऊ पण ऐकत कोण आमचं आणि ह्यावेळी ऊन जरा जास्त असत आणि सूर्य डोक्यावर असतो हे माहित आहे तरी हि "

"अगं सकाळी देशपांडे म्हणाला कि बाजारात मस्त मासे आले आणि ते हि स्वस्त तुला तर माहित आहे कि मी किती मासे प्रेमी ते "

"हो ना आणि तुम्ही गेलात मासे आणायला" 

"हे बघ ते जाऊ दे मस्त पैकी लिंबू सरबत करून दे मग बघ मला बरं वाटेल "

"हो आणते ना लिंबू सरबत मग जेवण पण करते तुम्हला ना माझं पडलेलंच नाही नुसते हे कर ते कर माझ्या मेलीच कोणाला पडलंय "

"अगं असं काय म्हणतेस तुच्या म्हतारी शिवाय मला आहे कोण "

"हो ना मग आपलं वय पाहून काही गोष्टी कराव्या आपल्याला जमेल तेच करावं "

"अगं हो झालं तूच उगीच पहिलीच डोकं गरम झालं आहे त्यात आणि तू पारा नको चढवूस "

"हो हो मी चुकले तुमच्या आरोग्याची काळजी करते ना करा तुम्हला काय हवं ते "

देसाई आजी रागाने किचन मध्ये गेल्या इथे देसाई आजोबा जरा शांत बसले त्यांना हि आजीचे म्हणे पटले तसे हि ते दोघेच एकमेकांचे सोबती होते मुलं तर नोकरी निमित्त परदेशी स्थयिक झाली होती देसाई आजोबा कवी पण होते मध्ये मध्ये ते कधी आपले प्रेम आजी समोर कवितेनेच व्यक्त करत आजोबा ख्रुचीवरून उठले त्यांनी आत डोकावून पहिले तर आजी जेवण करण्यात व्यस्त होती आणि तिचा चेहेरा जरा पडला होता आजोबा आत गेले आजीकडे पाहत म्हणाले,

रवी आला डोईवरती तापले माझे डोके मत्स्यप्रेमी मी 

नाही भान मला राहिले 

आलो घरी पळत मी 

उभी समोर माझी सौभ्याग्यवती 

काळजी पोटी मला बोलली 

माझी ही अशी कशी बोबडी वळली 

मन दुखावले मी तिचे 

माफी मागतो 

हे सूर्य देवा तुच्या पासून सुरु झालेला हा वाद 

ह्यात तूच प्रेमाचा प्रकाश टाक 

हसरा चेहरा होऊ दे माझ्या प्रियेचा 

आभारी राहीन मी सदैव तुझा

आणि नकळत आजीच्या चेहऱ्यावर कळी खुलली 


Rate this content
Log in