राखणदार
राखणदार
संकटसमयी नाव येते ते देवाचे
मोहन साठे आपल्या मित्रांकडे गोव्याला आले होते गोव्याच्या म्हापसा शहरात त्याचे वास्तव्य होते
मुंबई चा मित्र आल्याने रमेश केणी यांनी त्यांना म्हापसा शहराचा फेरफटका मारला मोठ्या बाजारपेठेची सैर केली आणी गाडी येऊन एका भव्य अशा मंदिरा समोर उभी राहिली
खुप साऱ्या खांबांनी आणी भल्या मोठ्या झाडांनी वेढलेल ते मंदिर दिसण्यास सुंदर होते मंदीराला एक ही दरवाजा नसल्याने चार ही बाजुचा वारा श्री चरणी नतमस्तक होत होता मध्यभागी भली मोठ्या उंचीची अशी मुर्ती डोक्यावर फेटा खांद्यावर कांबळ मस्तकी टिळा चुपकेदार मिशा एका हातात दांडा तर दुसऱ्या हातात पेटती मशाल धोतर नेसलेले पायात कोल्हापुरी चपला अशी ही सुबक मूर्ती
"मोहन हा आमचा राखणदार श्री देव बोडगेश्वर संकटसमयी नाव घेताच धावुन येणारा आमचा देव रात्री अपरात्री ह्यांच्या श्रद्धेवर तर आम्ही निर्धास्त फिरतो चुकल्यावर वाट दाखवणारा पाठीशी उभा असताना कसली भिती नसते"
"अरे बाबा हो माझा मित्र मुंबई सुन येयला देवाकडे बरे गाऱ्हाणे घाल "
भटजी ने गाऱ्हाणयाला सुरू वात केली दोघांनी डोळे मिटून देवाला मनापासून नमस्कार केला
"चल मोहन निघुया आज मस्त पैकी मासे मिळालेत लवकर घरी पोहचुया "
दोघेपण घरी परतले रमेश ची बायको जेवणासाठी माश्यांची त्यांची वाट पाहात होती
"आलात किती उशीर "?
"अगं बाजारात गेलो आणी मंदीरात पण जाऊन आलो "
"मस्त मंदीर आहे वहीनी मन्न प्रसन्न झाले "
"बसा तुम्ही तुमच्या साठी चहा आणते"
"नको वहीनी "
"बरं पटकन जेवण करते मग जेवा तर"
असेच दोन दिवस गेले संध्याकाळची वेळ
"अरे रमेश मला तुझी सुक्टर दे जरा फेरफटका मारून येतो तस ही मुंबईत फक्त आम्हाला लोकलच पकडावी लागते "
"मोहन तु एकटा कशाला मी येतो थांब"
"अरे नको तुझ्या दुकानावर सामानासाठी खुप गर्दी आहे मी जाईन "
"बरं सांभाळून "
"हो "
मोहन ने स्कुटर स्टार्ट केली आणी फुरकन नेली फेरफटका मारता मारता एका जागी गाडी काही चालेना
"अरे चा पेट्रोल संपले वाटते "
चारही बाजूंनी नजर मारली तर त्या रस्त्यावर शुकशुकाट होता अंधार ही पडला होता फोन करावा तर फोन ही आणला नव्हता
"आता काय करायचं "?
एक ही गाडी ही त्याबाजुनी जात नव्हती
इथे घरी सगळेच चिंतेत होते
मोहनला भिती वाटु लागली आणी नकळत त्याच्या तोंडून "बोडगेश्वरा पाव "हे आले भितीने त्याला घाम फुटला होता
तेवढ्यात त्या रस्त्याने कोणी चालत येताना दिसले
कोल्हापुरी चप्पल फेटा बांधलेला धोतर परिधान केलेला हातात दांडा अश्या वेशात त्यांच्या समोर येऊन थांबली
"काय रे पोरा रस्त्यावर कशाला उभा आहेस"?
"काही नाही पेट्रोल संपले "
"मग तुला कशीच ढकलत न्यावी लागणार कारण ह्या रस्त्यावर रहदारी नसते "
"काय पाव्हणा आहेस का "?
"तुम्ही कसे ओळखले"
.
"अरे तु भितीने चिंब भिजलायस भिऊ नकोस मी मदत करीन गप्पा मारत चालुया "
पण तुम्ही इथे कसे
"मी हो माझ्या गाई चरायला येतात इथे गेल्या वाटत घरी त्यांना पाहायला आलेलो"
"चल निघुया आपण"
मोहन स्कुटी ढकलत चालू लागला गप्पा मारत मारत त्या दोघांनी बरच अंतर कापले होते
"चल रे पोरा तुझा रस्ता आला सरळ चल की पोहचलाच घरी "
"धन्यवाद बाबा"
"धन्यवाद कशाला सदैव सुखी रहा"
इथे रमेश आणी त्याचे कुटुंबीय चिंतेने व्याकूळ झाले होते पोलीस स्टेशन मध्ये जाण्यासाठी रमेश तयार झाला एवढ्यात
"बाबा मोहन काका आयलो"
अशी त्यांच्या मुलांची हाक आली त्याने घराबाहेर धाव घेतली तर खरंच मोहन स्कुटर ढकलत आणत होता
"अरे मोहन कुठे गेला होता?
प्रश्नांचा भडीमार चालू केला.
"हो थांबा "
मोहन ने स्वीस्तर घरी पोहचे पर्यंतची गोष्ट त्यांना सांगितली
"खरंच तुला अश्या माणसाने तुला आणुन सोडले "
"हो रे खरंच "
"
"नशीबवान आहेस तू मोहन जी देवा बोडगेशवराची मदत आणी सहवास तुला लाभला "
"काय????"
"हो "
"तरी विचार करत होतो मी इथला पत्ता न सांगता मला इथवर आणुन कसे सोडले देवा धन्य झालो मी अशीच तुझी कृपा दुष्टी आम्हा सर्वांवर ठेव
देव बोडगेश्वर महाराज की जय !!!!! सगळ्यांनी एकत्र मिळून जयजयकार केला...
