Unveiling the Enchanting Journey of a 14-Year-Old & Discover Life's Secrets Through 'My Slice of Life'. Grab it NOW!!
Unveiling the Enchanting Journey of a 14-Year-Old & Discover Life's Secrets Through 'My Slice of Life'. Grab it NOW!!

Ashvini Duragkar

Others

5.0  

Ashvini Duragkar

Others

राहाव तर असच राहाव...

राहाव तर असच राहाव...

2 mins
749    वयाची वाढती वर्षें न थांबता वाढत जावी पण चेहऱ्यावरील हास्य मात्र फुलत जाव.. वयाच बंधन आपल्या हसण्यात अनिवार्य नसावच.. चेहऱ्यावरील त्या हास्यात काहीही बदल होता कामा नये बर का...? जिवणात उतार चढाव... प्रत्येकाच्या येतात पण उतारातील गोड आणि चढावातील वाईट अनुभव घेवुन सदा हसत राहावे... उलट त्या हास्याला नवीन रूप देत जाव.. रुसव्या फुगव्यांना हास्याच खत पाणी घालाव..... न मिळालेल्या गोष्टींमागे नुसतच फरकट न बसता आहे त्यात समाधान मानाव... नवनवीन संगत करुन काही तरी वावग शिकाव... प्रवाहाच्या सोबत न वाहाता आपला वेगळा वेग साधावा... आपल्यापेक्षा मोठ्यांकडन अनुभव तर लाहाणांन कडन ऊर्जा आत्मसात करावी... यश अपयशाला न जुमानता जीवन गाडी सुरु ठेवावी... आपल्या आवडी निवडी न विसरता कायम त्या जपत राहाव्या... 

   हसण्या... हसवण्याचे मार्ग बरेच आहे फक्त निवड योग्य असावी... 

     कधी जुन्या मैत्रींनी बरोबर दिल खुलास गप्पा करत हसाव... तर कधी लहान मुलांबरोबर लहान बनुन खळखळत हसाव... कधी नवऱ्याबरोबर गालातल्या गालात लाजत हसाव... तर कधी एखाद जोक वाचुन मन मोकळ करत हसाव.... कधी कधी लपुन छपुन नवऱ्याच्या पेग मधन एक घुट पिऊन हळुच एक डोळा मारत अलगद हसाव.... तर कधी निसर्गाच्या सानिध्यात फुलपाखरांन सारख अलगद पंख हलवत बागळात हसाव... तर कधी काजव्यांसारख क़िट्ट काळोखात लखलखत हसाव... कधी कधी एकांतात हळु आवाज़ात आवडीच गाण ऐकत मनातल्या मनात हसाव...तर कधी मोठ्या आवाजात गाण लावुन वाकडतेकड नाचत हसाव... 

     तर कधी पाणी पुरी... आईस गोला खावुन समाधानाने स्मित हास्य हसाव.... तर कधी नवऱ्यासाठी काही तरी special करुन त्याची वाहवाही घेत मुटकुन हसाव... कधी घरात serious गोष्ट सुरु असेल तर सगळयांच्या चेहऱ्याकडे एक नजर बघुन चटकन हसाव... 

  म्हणतात हसल्याने हृदय निरोगी राहात... चेहऱा कायम चमकतो... सुरकुत्या पडत नाहीत.... रक्त प्रवाह सुरळीत होतो... सदैव हसणारे लोक कमी आजारी पडतात... एक वेगळी सकारात्मकता त्यांच्या सहवासात मिळते... म्हणुन चेहऱ्यावर नेहमी हास्य उमलु द्याव... ही एक अशी वस्तु असावी ज़िला अजिबात विसरु नये.... ते निरंतर चेहऱ्यावर तेवत ठेवाव....Rate this content
Log in