पुस्तक
पुस्तक
"राज अरे मीच बोलत आहे आणि तू नुसता गप्प बसलास काय रे काय झालं "?
"काही नाही "
"मग एव्हडा उदास का आहे अरे यार आपण वर्ल्ड टूर ला चाललो आहे परवा आणि तू हैप्पी नाही आहेस का मला तर कधी एकदा परवाचा दिवस येतो असे झाले मज्जा येणार आहे तरी बघ तुझा चेहरा जसे आपण लडाई वर जाणार आहोत तू पण राज "
"मला नाही एव्हडी उत्सुकता "
"म्हणजे अरे यार सगळेच जण नाही करत वर्ल्ड टूर आणि तूला करायला मिळतो तर ह्या पेक्षा सुख म्हणजे काय असत "
"माहित नाही रिया पण नाही उत्सुकता"
"पण का "?
"तुच्या खुशीसाठी मी चाललो "
"म्हणजे "
"रिया वर्ल्ड टूर नाही काही गोष्टी नसतात सगळ्याच्या नशीबी"
"म्हणजे "
"मी लहान असताना ची गोष्ट असेन ६ वीच्या वर्गात तेव्हा आमची परस्थिती चांगली नव्हती बाबा एकटे कमवणारे आम्ही ४ भावंडे आमचा शिक्षणाचा खर्च घरातला खर्च आम्ही राहत सुद्धा भाड्याच्या खोलीत आई काटकसर करून घर चालवायची कधी कधी शिवण शिवून थोडी मदत करायची. पण तशी बेताची परिस्थिती. असेच एक दिवस आम्हला शाळेत भूगोलाच्या गुरुजींनी ऍटलास म्हणजे नकाशाचे पुस्तक आण्यास सांगितले. मी सहज शाळेतून येताना बुक स्टॉल वर किंमत विचारली २५०/- ऐकून मला धडकी भरली. एव्हडी मी गप्प घरी आलो कोणालाच काय सांगितले नाही दुसऱ्या दिवशी शाळेत न जाण्याचे ठरवले. सकाळीच पोटांत दुखायचे नाटक करून शाळेची वेळ मारून गेली पण संध्यकाळी आई बाहेर सामान आणायला गेली होती ती आली आणि तिनी मला तडक प्रश्न केला "राजेश अरे त्या सुमन ची आई भेटली होती ती सांगत होती कि सुमन ला शाळेत नकाशाचे पुस्तक आण्यास सांगितले आणि त्याची किंमत महाग आहे म्हणून "आईच्या ह्या प्रश्नाचे उत्तर कसे द्यावे हेच मला कळेना आईने माझ्या डोळ्यात पहिले तिला समजले कि मी काहीतरी लपवत आहे तसे हि ती आई तिच्या पासून काय लपवुन राहू शकत मग मी हि लपवून ठेऊ शकलो नाही आईला शाळेत न जाण्याचं कारण सांगताच तिचे डोळे भरून आले. एवढ्याश्या वयात एव्हडी समजुदारपणा पाहून तिनी मला मिठी मारली आणि रडू लागली. तिनी आपल्या पाकिटातून २५०/-रुपये काढले आणि माझ्या हातावर ठेवले आणि मला पुस्तक घे म्हणाली. आणि सामना साठी नेलेली पिशवी रिकामी घडी करून ठेवली. तो आठवडा आम्ही माझ्या पुस्तकासाठी फक्त कोरा चहा आणि टोस्ट वर काढला. त्या दिवशी मला गरिबी काय असते हे जाणवले. मग मात्र ठरवले आता असे पुढे परत होणे नाही शाळा संपली कि मी हॉटेल वर कप बशी धुऊन देऊ लागलो. हळू हळू वेगेवेगळे काम करू लागलो माझ्या शाळेचा खर्च स्वतः करू लागलो. खूप शिकलो पदवीधर झालो आज माझ्या कडे चांगली नोकरी आहे. आज २५०/-रुपये माझ्या साठी शुक्ल असतील आज ऐशो आराम आहे वर्ल्ड टूर ला पण चाललो आहोत, पण तेव्हा त्या नकाशाच्या पुस्तकाची २५०/-रुपयाची किंमत मला कोटीत दिसत होती "
