Varsha Shidore

Others

3  

Varsha Shidore

Others

पुस्तक आयुष्याचं...

पुस्तक आयुष्याचं...

1 min
692


वरून सुंदर दिसणारं आयुष्याचं 'फाटकं' पुस्तक

असेल न रुचणारं, नावडीच्या खोबारभरतीचं

गळणाऱ्या पानांवर लिहिलेलं असेल हरवलेलं 'स्वप्न'

ओबडधोबड पानांवर नसेल 'मनाचं राज्य'

शाई झाली असेल 'फिकट' स्वतःची समजूत काढताना

 नसेल जमत जोमानं 'लढत रहा' म्हणायला

'प्रयन्तांती परमेश्वर' म्हणून फाटकं जुळेल

नसेल इतका विश्वास नि सहनशीलता

पण आयुष्याच्या फाटक्या पुस्तकाचा घेऊन मुका

आजचा वेदनाकारी नि दुःखी वर्तमान

उद्याचा असेल 'नावाजलेला इतिहास' !!!


Rate this content
Log in