प्रवास आयुष्याचा
प्रवास आयुष्याचा
"माहित नाही मी कुठे चालतो "
पण आहे प्रवासी मी ह्या जीवनाचा
प्रवास करण्यास आयुषाचा
मी धरिला रस्ता जीवनाचा "
"वाह काय ओळी लिहिल्या अप्पा मस्त "
"अरे वरूण तू कधी आलास "?
"जेव्हा तुम्ही खुर्चीवरून'उठून आत गेला "
"अरे हो का अरे तहान लागली म्हटलं पाणी पिऊन येऊ बरं तू कसा काय अचानक आणि एकटाच आलास "
"काही नाही हो अप्पा आईने लाडू बनवले म्हणाले अप्पाना देऊन ये "
"हो का माझ्या अपुला आमची काळजी असते रे "
"असणारच तुमची एकुलती एक लेक ना "हो रे बाबा आमची एकुलती एक लेक ती म्हूणन काही बाही पाठवत असते "
"अप्पा आजी कुठे दिसत नाही "?
"अरे ती शेजारच्या देशपांडे वाहिनी बरोबर मंदिरात गेली "
"तुम्हला एकटे कंटाळा येत नाही "?
"असा काय रे विचारतोस "
"म्हणजे जेव्हा आजी नसते तेव्हा तुम्ही एकटेच पडत ना "
"हो रे मग असाच काहीतरी लिहीत बसतो "
"अप्पा तुम्ही आणि आजी आमच्याकडे कायमचे राहिला का नाही येत तिथे माझे आजोबा पण असतील तुमच्या सोबतीला "
"नाही बाळा आम्ही इथे खुश आहोत "
"पण आई काळजी करत बसते तुम्ही तिच्या समोर असलात कि तिला पण बरं वाटेल आणि बाबा पण तयार आहेत एकत्र राहण्यासाठी
"नाही अनिरुद्ध म्हणून खूप चांगला जावई लाभला आम्हला पण तिथे राहणं नाही रे जमणार काही झालं तरी ते मुली चे सासर तसे हि तुझे आजी आजोबा पण खूप चांगले आहेत पण आमचे घर सोडून ते ही बंद करून जाणे मनाला पटत नाही "
"अप्पा बंद कुठे फेरी मारत राहून तुम्हाला कधी हि यावंसं वाटलं मला सांगा मी तुम्हाला घेऊन येईन "
"हो रे माझ्या लाडक्या नातवा पण हे घर सोडणे नाही रे ह्या घराने आमच्या बरोबर खूप प्रवास केला आहे तुच्या पणजोबा नी खूप मेहनतीने हे घर उभे केले माझे बालपण ह्या अंगणात झाले मग माझी पाहिली नोकरीचा आनंद माझे लग्न माझा संसार तुच्या आईचे बालपण आणि आता आमचे म्हतारपण सगळया सुख दुःखाचा प्रवास ह्या घरांनी केला आता कसे एकटे टाकून जाऊ शकतो आणि हो तूंचि वाट पाहणे आणि अपुने काहीतरी पाठवणे ह्यात जी मजा आहे ना ती काही औरच आहे आणि ती मजा घेत घेत आम्ही जीवनाचा प्रवास करत आहोत आणि त्यात खूप सुखी समाधानी आहोत "
आता काय बोलणार मी चला अप्पा निघतो तुम्ही तुमच्या पुढच्या ओळी लिहिण्यास सुरु करा.
