परतुनी येऊ का माहेरी ...
परतुनी येऊ का माहेरी ...
रिया आज खूप दिवसानी आपल्या माहेरी जात होती दोन दिवसाचा मुकाम होता कधी एकदा घरी पोहोचते असे तिला झाले होते. एकदाची ती घरी पोहोचली आई तर वाट पाहत होती आज तिच्यासाठी आईने खास मेजवानी केली होती बाबा हि आज हाल्फ डे टाकून येणार होते रियाचा भाऊ कॉलेजला गेला होता आज खूप दिवसानी आपली ताई येणार म्हूणन तो हि खुश होता दुपारी सहभोजनाचा कार्यक्रम होता ...
दुपारी बाबा आई रिया आणि तिचा भाऊ ऋषभ यांनी सहभोजन केले गपा टप्पा नि संध्याकाळ कशी सरली कळेच नाही दुसऱ्या दिवसही गप्पा गोष्टी आठवणीत गेला ते दोन दिवस रिया साठी अनमोल होते ..
परतीचा दिवस उजाडला घराबाहेर पाय पडयला तयार नव्हते..पण सासरी तर जायला हवे होते. रिया ने बॅग घेतली आई बाबाचा निरोप घेऊन ती घराबाहेर पडली तिनी आईकडे पहिले आईचे डोळे पाणावलेले तिला हि भरून आले ले पण लपवत ती निघाली थोड्या अंतरावर पोहोचल्यावर तिने मागे वळून पहिले तर आई दारात
उभी होती तिने आईला हात दाखवला आणि हळू हळू ती आईच्या नजरेआड गेली ...
बस उभी होती रिया पटकन बस मध्ये जाऊन बसली बस सुटायला वेळ होता रिया ला भरून आले होते तिने आपल्या रुमालाने डोळे पुसले आणि ती विचार करू लागली.
"काय नशीब असत ना मुलीच जन्म झाल्यावर "माझं घर माझं घर " म्हणारी मुलगी लग्न झाल्यावर तेच घर तिच्यासाठी माहेर होऊन जात आणि कोण्या दुसऱ्याच घर आपलं मानावं लागतं वयाची काही वर्ष आपल्या माणसाबरोबर काढावी लागतात जे नाव जन्मानंतर ओळख देते त्या नावाला पुसून नव्या नावाची ओळख मिळते नवीन घर नवीन जबाबदाऱ्या नवीन आयुष्य सगळं काही सांभाळून ह्याव लागत हक्क गाजवणाऱ्या त्याच घराकडे येण्यासाठी काहीच दिवसाची भुभा असते सगळ्या आठवणी मनात कुठे तरी बंदिस्त कराव्यात लागतात नकळत कधी अश्रू द्वारे त्या प्रकट होतात आईच्या हातच्या जेवणाची चव विसरावी लागते नाही मिळत तिच्या बरोबर दररोज खूप साऱ्या गप्पा मारण्यासाठी वेळ खूप आठवण करून देते तो तिचा तो सहवास.
कधी कधी वाटते परत लहान व्हावे तिच्या मांडीवर अंगाई गीत एकून झोपावे तिच्या कुशीत झोपून लाड करून घ्यावे तिच्या हातच चिऊ काऊना बोलवणारा घास घावा .बाबा कडे चॉकलेट साठी रडावं बाबा बरोबर मस्त फिरून यावं हेच अनमोल क्षण असतात एका मुलीच्या नशिबात एकदा ची पायरी ओलांडली कि मग तेच आई बाबा आपल्या सोबत नसतात
बस कधीच सुटली होती पण रिया आपल्या विचारात एव्हडी मग्न होती कि कंडक्टर जोरात ओरडला तसे रिया ने पैशे देऊन तिकिट घेतले आणि ती आपल्या विचारात गडून गेली ...
अचानक तिचा फोन वाजला फोन होता वरूनचा वरून म्हणजे रियाचा नवरा बोलून तिनी फोन ठेवला आणि ती स्वतःशी संवाद साधु लागली "नशिबाने मला चांगला नवरा मिळाला खूप प्रेम करणारा लग्नांनतर त्याने मला खूप सांभाळून घेतलं आई बाबाची कमी भासू नये मंहून तो नेहमी सोबत असायचा म्हून तर आई बाबा ना वरूनचा अभिमान आहे आता तिला आतुरता होती त्याला भेटण्याची एवढ्यात बस थाबली पहात तर वरून तिला घेण्यसाठी आला होता त्याला पाहताच तिच्या रडवलेला चेहऱ्यावर हास्य उमटलं .....