प्रतीक्षानंद नि भेट...
प्रतीक्षानंद नि भेट...
1 min
546
असावा दूरवर
मत्सराचा राक्षस
नसावा दुरावा
मैत्रीच्या सागरास
भेटीच्या प्रतीक्षेचा
आनंद लोभस
असावा सहज
मंगलमय प्रवास
भेटण्यातरी आतुरता
सुखानंद पेरणारी
स्मित डोळ्यात
आपोआप रचत जाणारी
पाहताक्षणी बोलके
ते बोल सहज उमटावे
नात्यातल्या मैत्रीचे
बंधन क्षणात मिटावे
