परत एकदा भेट
परत एकदा भेट
आदित्य ने घड्याळात पहिले ४ वाजून ५ मिनिटे होऊन गेलेली तो कॅफे मध्ये तिची वाट पाहत बसला होता पण मेघना चा काही पत्ता नव्हता त्याने तिला फोन करण्यासाठी मोबाईल हातात घेतला एवढ्यात ती येताना तिला दिसली आणि तो थोडा सावरला ती समोर येताच तिला बसण्यास सांगितले आणि तिला पाहून त्याने तिला विचारले" कशी आहेस " ?
तिने त्याच अंदाजात उत्तर दिले "कशी दिसते "?
आदित्य च्या चेहऱ्यावर हसू पसरले त्याने तिच्या कडे पाहत म्हणाला "पहिली सारखी च सुंदर सोज्वळ "
आदित्यचं कौतुक मेघनाला पचनी न पडलं ती लगेच म्हणाली "पुरे का फोन केला होतास आणि भेटण्यास का बोलवलं "
थोडा चेहरा गंभीर करत आदित्यने मेघना ला पाहत म्हणाला "आई मावशी कडे आली होती आणि काल घरी आली आहे तिला तुला भेटायचं आहे "
"का "?
"खूप दिवस झाले तिनी तुला पहिल नाही ना फोन वर बोलणं झालं त्यामुळे तिला तुझी खूप आठवण येते हें बघ मेघना आपले मतभेद आपण बाजूला ठेवून फक्त एकदा तू आईला भेटून जा तिला बरं वाटेल"
"हे बघ आपलं सगळं संपलं आहे मग कशाला उगीच नात्याचा खेळ "
"मान्य आहे मेघना आपलं नातं एका सहीवर संपलं पण आई तुला मुली प्रमाणे वागवायची ते तर विसरू शकत नाही मी एकटा रहातो आणि आई आज खूप दिवसांनी गावावरून आली आहे ना माझ्या साठी नाही आई साठी तू तिथे यावं असं मला वाटत "
मेघना काही हि न बोलता तिथून निघाली आदित्यने तिला थांबवता विचारले "मेघना मग तू येणार ना "?
ती पलटली 'माझं येणं मी काकूंना सांगेन म्हणत ती निघून गेली "
मेघना ने काकू म्हण्टलेले आदित्य ला आवडले नाही कारण ती आदित्यच्या आईला आई च म्हण्याची लग्न होऊन काही दिवस सासू सुनेने मस्त मजा केली होती मग सासू गेली गावी पण दोन वर्षात च त्याच्या संसाराला नजर लागली एक छोटस भांडण सहीवर येऊन संपलं
आदित्य घरी परतला त्याला गरमा गरम चहा आणि भजी देत आईने आदित्य कडे विषय काढला "आदित्य केलास फोन मेघनाला कधी येणार ती जायच्या अगोदर तिला पाहीन असे वाटते
आदित्यकडे उत्तर नव्हते त्याने आईला पाहत म्हटले "ती कळवेल तुला "
असेच दोन दिवस गेले मेघनाचा काय पत्ता नव्हता तिसऱ्या दिवशी आदित्य ऑफिस मधून आला त्याने पहिले कि आई किचन मध्ये व्यस्त आहे हाथ पाय धुऊन तो सोफ्यावर बसला आई ने गडबडीने चहा ठेवला आणि ती किचन मध्ये गेली हें पाहून आदित्यने आईला विचारले" आई हि कसली गडबड चालू आहे तुझी आणि हि अळूची पाने "
हसत हसत आई ने आदित्य कडे पाहत म्हण्टले "मेघना येणार उद्या तिच्या आवडीचे अळू वडे करणार आहे मी सकाळी गडबड नको म्हूणन आताच तयारी करून ठेवते "
हे ऐकून आदित्य च्या चेहऱ्यावर एक समाधान जाणवले तो लगेच आपल्या रूम मध्ये गेला थोड्या वेळाने आई सोबत जेवताना उद्या तो कामावर हाल्फ डे जाणार म्हणून सांगितले आई ला त्याचे हे कारण कळे
अशीच सकाळ उजाडली आदित्य हि तयार होता पण आईला तो दाखवत नव्हता आईने अळू वडे मस्त पैक्की तेलात तळून ठेवले एवढ्यात बेल वाजली आईने दरवाजा उघडला तर समोर मेघना होती तिला पाहताच तिला खूप आनंद झाला
"ये मेघना बस कशी आहेस "
'बरी आहे काकू "
काकू हे ऐकून जरा आदित्य ची आई दुखावली पण तिने मनाशी समजूत काढली कि त्याच नातंच नाही तर कसली अपेक्षा त्याचा आवाज ऐकून आदित्य बाहेर आला आणि सोफ्यावर बसला दोघी हि गप्पा मारत होत्या पण त्यात ती आपुलकी नव्हती
तेव्हडयात आदित्य ची आई आत गेली आणि प्लेट मधून अळू वडे घेऊन आली तो पर्यंत दोघेही गप्प बसले होते
मेघना कडे देत आदित्य ची आई म्हणाली" घे मेघना तुझ्या आवडीचे अळू वडे "
'हे सर्व कशाला उगीच त्रास कशाला घेतलास काकू "
काही नाही ग आपल्या माणसांसाठी केलं तर कुठे बिघडत खा ना आणि घे घरी घेऊन जा '
'नाही नको तुमचा डबा "
"अगं डबा देण्यासाठी परत ये कि म्हणजे परत एकदा भेट होईल "
"नाही नको मी निघते"
"अगं एवढ्या लवकर थांब ना थोडा वेळ अजून आपल्या गप्पा कुठे झाल्या "
'नाही सॉरी मला निघावं लागेल "
मेघनाचा जाण्याचा घट्ट आणि आईचा थांबवण्याची आशा पाहून आदित्य ला राग आला त्याने मेघना कडे पाहत म्हटले "मेघना आई सांगते तर रहा ना थोडा वेळ एव्हडी कसली घाई झाली तुला "
आदित्यचे असे बोलणे मेघनाला नाही आवडले "एक मिनिट मला कसली घाई झाली असेल पण तू माझ्यावर असा रौब नको दाखवूस मी तुझी बायको नाही आहे "
आणि परत एकदा शाब्दिक चकमक झाली
'गप्प बसा रे शांत व्हा वाटलं होत कि ह्या निमित्ताने तुम्ही दोघे परत एकत्र येतील पण कुठलं काय "
"काकू म्हणजे तुम्ही मला इथे परत एकत्र होण्यासाठी सॉरी काकू विसरा आता आम्ही केव्हाच वेगळे झालो "
'अगं त्या एका सहीने तुम्हला वेगळे केले मनाने नाही परत एकदा दोघे हि विचार करा परत एकत्र या असे मला वाटते '
"आई तू हे काय बोलतेस '
हो आदित्य मला मनापासून तुम्ही एकत्र आलेलं पाहायचं आहे कोणाचे चुकले कोण बरोबर हे मला नाही माहित पण अरे रुसवे फुगवे कोणाच्या संसारात नसतात म्हूणन कोणी परस्पर नातं तोडत नाही
हे बोलणे मेघनाला असह्य झाले ती काही हि न बोलता तिथून निघून गेली आणि आदित्यची आई तिच्याकडे मागे फिरण्याच्या आशेने पाहत राहिली
