प्रिय आईस ....
प्रिय आईस ....
" येतो गं काळजी घे "
समीर विभाचा निरोप घेऊन बिसनेस टूर साठी निघाला आठ दिवस तरी तो परतणार नव्हता. घरात समीरचे आजारी आईबाबा आणि विभा होती. विभाला आज ऑफिसला सुट्टी असल्याने सगळी घरातील कामे पार पडली होती निवांत असा क्षण तिच्या कडे होता पण सोबत कोणाची नव्हती. आज सकाळ पासून तिला आईची खूप आठवण येत होती आईला फोन लावावा तर तिची झोपायची वेळ म्हूणन तिने टाळले, सहज तिने ड्रॉवर उघडला आणि डायरी काढली त्या डायरीत तिने आपल्या आयुष्याचे अनमोल क्षण टिपले होते एक एक पान परत असताना ती एका पानावर येऊन थांबते आणि अलगद ती वाचू लागते
प्रिय आईस ...
तुला मी कधी पत्र लिहिले नाही पण आज लिहावंसं वाटलं., आई आज तूंचि खूप आठवण येते नेहमी येते पण न जाणे आज जरा खूपच तुला उचकी नकीच लागली असेल माझी पण तुला खूप आठवण येत असेल ना आणि काळजी पण आपली पोर कशी नव्या घरात वावरत असेल आणि त्यातून तुच्या पापण्या हि ओल्या झाल्या असतील.. असंच असत एक घट्ट आई आणि मुलीचं नातं.. तुही आठवणींचे दिवस अनुभवले म्हणुन तर आजी नेहमी सांगते माझ्या पोरीने संसारासाठी खूप कष्ट काढले म्हूणन तर आज सुखात आहे हे सांगताना तिला मात्र भरून येते.
आपलं नातं मात्र वेगळ आहे मायलेकी पेक्षा आपण चांगल्या मैत्रिणी आहोत कुठलं हि सीक्रेट आपण एकमेकापासून कधीच लपवून ठेवलं नाही जे मनात असत ते बिंदास बोलून जातो एवढा आपलेपणा आपल्या नात्यात फक्त तुच्या मुळे आहे कारण तू लहानपणा पासून घर कसं हसत खेळत ठेवलं. आईचा दरारा तू आमच्या वर कधीच टाकला नाही कडक आई न बनता एक प्रेमळ आई बनलीस आमच्यावर चांगले संस्कार केले. आम्ही वाईट दिशेने न भटकण्यासाठी तू नेहमी एक मैत्रीण बनून पहारेकरी बनलीस. आज चे माझे चांगले व्यक्तिमत्व आहे त्याचे श्रेय मी तुलाच देते, म्हूणन तर नव्या घरात हि मी नकळत रुळले
माझ्या आयुष्यात मला तुच्या सारखी चांगली पत्नी एक चांगली सून आणि एक उत्कृष्ट आई बनायचं आहे.. तूंचि सर कोणालाच नाही पण मी तुचीच सावली असल्याने थोडे फार तरी तुच्या प्रमाणे बनण्याचा नकीच पर्यत करेन.
आणि काय बोलू सुचत नाही गं आपण दूर असलो तरी मनाने मात्र तू नेहमी माझ्या बरोबर असते वयाची फक्त २५ वर्ष तुच्या बरोबर घालवली आणि माझी सासरी पाठवणी झाली तुच्या सहवासातील प्रत्येक क्षण मला अजून ही आठवतो लहानपणी शाळेतून आल्या नंतर तुच्या हातचे जेवण जेवल्या नंतर जो आनंद व्हायच तो शब्दात हि सांगू शकत नाही
रविवारची आम्हा भावंडांची खाण्याची फर्माइश तू कितीही थकलीस असली तरी तू पूर्ण करायची तेव्हा आम्ही लहान होतो तुचा थकवा तू आम्हला कधीच जाणवू दिला नाहीस हसत मात्र तू राही ..आता सुद्धा घरी आल्यावर वय झालं तरी तू आमच्यासाठी किचन मध्ये व्यस्त असते. असू दे म्हटल्यावर तू मात्र म्हणतेस तु आता थोडीच परत परत येणार म्हणतात ते खरं आहे आई च मन आणि आईची जागा कोणीच घेऊ शकत नाही
देवाकडे एवढेच मागते मी पुढच्या जन्मी तुच्याच पोटी जन्म मिळवा.
तुचीच
लाडकी लेक
नकळत विभाला रडू आले लग्नानंतर विभाने हे पत्र आईला लिहिले होते तिनी डायरी बंद केली. डोळे पुसले तिला काहीतरी आठवले सासरी पाठवणी करताना आई ने तिला आता ते हि तुचे आई वडील आहेत त्याची सेवा कर, हा कानमंत्र दिला होता आणि दुसऱ्या आई वडीलाच्या म्हणजे सासू सासऱ्याच्या सेवेस विभा तत्पर झाली.
