प्रेमाचा सुगंध
प्रेमाचा सुगंध


रुसव्याचे दुरावे मिटवणारं
समाधानाने स्मितात लाजवणारं
दोन प्रेमींच्या प्रेमबंधाचं आगळंवेगळं
अस्सल रूप वेडेपणात बघावं
आयुष्याचं जगणं सुकर करणारं
साथी सोबती भेटत वाहवत जातं
अशा दोघांच्या मनाला भावतो
प्रेमाचा रंगीन नखरी विडा
नखशिखांत वेड लावणाऱ्या
त्या बेधुंद निष्पाप जीवांना
मोहित करे गुलाबी प्रेमाचा
फुलांचा गुंफलेला सुगंध
विचारांतलं भावणारं वेगळेपण
जवळ आणणारं सारखेपण
आकर्षणाच्या फेऱ्या चुकवून
नतमस्तक निस्वार्थ प्रेमापुढे
भावनांचा कंठ फुटून सहवासाचा
अलगद उलगडे रहस्यमय प्रवास
मायेची हक्काची कुशी काहीशी
जेव्हा गरज सांत्वनाच्या हाकेची
जन्मजन्मांतराच्या पलीकडचा
प्रवास विश्वासाचा नि धैर्याचा
निराळा सुखात नि दुःखात
दळवळणारा मनमुरादी वारा