पिंजरा
पिंजरा




"काय पोपटराव मजेत दिसताय गाणं वैगरे गुणगुणताय "
"अहो आता आम्ही मजेत राहायचं "
"म्हणजे ?"
"अहो जैसी करणी वैसी भरणी म्हणतात ते काही खोट नाही "
"अहो पोपटराव असे कोड्यात नका बोलत जाऊ काय ते सांगा "
"कावळेराव तुम्ही कधी पिंजरा पहिला का "
"हो पहिला ना "
"त्यात कधी तुम्ही राहिलात तसे हि तुम्हाला कोण ठेवणार तुमच्या काळ्या रंगामुळे तुम्हाला दूरच ठेवतात"
"म्हणजे तुमचं म्हणणं काय आहे मी काळा म्हुणन पण हे लक्षात ठेवा पितृ पक्षात आम्हची चलती असते आमच्या शिवाय त्याच पान हलत नाही "
"अहो रागावता कशाला मी आपला सहज बोलून गेलो "
"सहज बोलता बोलता माणसासारखे पण थोडे वागलात तुम्ही"
"असो कावळेराव राग सोडा मुद्दा भरकटतोय "
"हे बरं आहे चोरी उपर से सीना चोरी "
"अहो कावळेराव माफ करा पण माझं म्हण तरी ऐका "
"बरं बरं सांगा "
"अहो मी तुम्हला पिंजऱ्याबद्ल विचारलेलं तुम्ही कधी नाही राहिला त्यात खूप अवघड जगणं असत मी होतो काही दिवस पण कसा बसा पळून आलो दिवस भर आपलं त्या एवढाश्या पिजऱ्यांत फिरायचं चारही बाजूनी लोखंडी सळ्या येत्या जात्या फक्त पाहत राहायचं दिलेलं पेरू किंवा मिरची खायची बस एवढच आयुष्य असत त्या पिजऱ्यांत मग कलाकार असल्यासारखे आपल्याला काही शिकवलं जात आणि कोणी पाहुणे आले कि करा त्याच्या समोर अभिनय बोलक्या बाहुल्या प्रमाणे असते जगणं न कुठे बाहेर जाणे न येणे न मित्र सोबती कोंडला जातो जीव एकटा माझ्या प्रमाणे कित्येक अशे आपले पक्षीमित्र अडकले असतील अश्या पिजऱ्यांत "
"ते मात्र खरं बोललात पोपटराव "
"कावळेराव म्हूणन मी खुश आहे "
"मला समझले नाही पोपटराव "
"आज काल बाहेर ची परिस्थिती पहिली ना तुम्ही एका विषाणू ने ग्रासलं य सर्व माणसांना उपाय म्हूणन लॉकडाऊन केलंय आणि माणसांना घरा बाहेर पडण्यास मनाई आहे`फक्त घरात बसून राहायचं आता त्यांना कळलं असेल पिजऱ्यांत राहणं म्हणजे काय ते आम्हला पिजऱ्यांत ठेऊन मज्जा वाटत होती त्याना आता चार भीतीत जीव कसा गुदमरतो त्याचा म्हणजे त्याना जीव आहे आम्हाला नाही "
"मान्य आहे पोपटराव तुमचे बोलणे पण आजची परिस्थिती पाहत वाईट वाटते एका क्षणात होतेच नव्हते झाले विचित्र असं भयभीतीचे वातावरण तयार झाले आहे त्या आहे नाआजी ज्या मला नेहमी चपाती चे तुकडे देतात त्याच्या घरातले संवाद ऐकताच कळते कि केवढी गम्बीर परिस्थिती आहे ती तुमचं पिजऱ्यांबद्दल मत पटलं मला पण आजच्या परिस्थिती सुक्या बरोबर ओलं हि जळत आहे पक्षी प्रेमी असो वा पक्षी द्रोही बळी पडतात मात्र दोघांचे ना निष्पाप बळी जात आहे ना कुठे उत्साह ना कुठे आनंद आणि पोपटराव पाहिले वेळ असेल जे गणेशाचं आगमन असं भीतीच्या सावटीत होणार खरंच खूप वाईट वाटते "
"हो तेही खरं आहे म्हणा कावळेराव मी पण थोड्यावेळासाठी माणसाप्रमाणे स्वार्थी झालो "
"पोपटराव काही बदलो आपण मात्र आपले पक्षीपण सोडता कामा नये "
"हो हो बरोबर कावळेराव "
"चला येता का समोरच्या सोसायटीत"
"कशाला ?"
"तिथे एक लहान मुलगा राहतो मी ओरडलॊ कि बिस्कीट आणून मला देतो खूप मस्त लागतात ती बिस्कीट
"नको बाबा मला बिस्कीट वैगरे नाही आवडत मी तर शेजारच्या गार्डन मध्ये जाणार मस्त पेरू लागलेत झाडाला आज भरपेट खाणार "
"बरं तर भेटूया पुन्हा पोपटराव"
"हो हो कावळेराव बाय"
"ओके पोपटराव काव काव"