Unmask a web of secrets & mystery with our new release, "The Heel" which stands at 7th place on Amazon's Hot new Releases! Grab your copy NOW!
Unmask a web of secrets & mystery with our new release, "The Heel" which stands at 7th place on Amazon's Hot new Releases! Grab your copy NOW!

akshata alias shubhada Tirodkar

Others

3  

akshata alias shubhada Tirodkar

Others

ऑनलाईन गणेशा

ऑनलाईन गणेशा

3 mins
67


(नेहमी प्रमाणे गणेशाचे सगळीकडे आगमन झाले पण अण्णा मात्र कोरोना मुळे ह्या वर्षी गावात नाही पोहोचले गावातला गणेशोत्सव शहरात आणि तो हि अपार्टमेंट मध्ये कसा अनुभवयाचा हा प्रश्न त्याच्यासमोर होता अण्णा आणि माई दरवर्षी गणपतीला कोंकणात जात मस्त पक्की अकरा दिवस राहून मग परतत पण ह्या वर्षी त्याचा प्लॅन फ्लॉप पडला त्याची ती घुसमट त्याच्या मुलाच्या लक्षात येत होती )


गणपतीच्या आदल्या दिवशी केवल आणि काव्या ऑफिस मधून हाल्फ डे आले ते मोट्या मोट्या पिशव्या घेऊन माईनी दरवाजा उघडला 

"अरे तुम्ही दोघे आज लवकर आणि ह्या एवढ्या पिशव्या कसल्या"? 

"माई उद्याची तयारी "

"उद्याची "? 

"हो गणेश चतुर्थी ना "

"अगं पण" 

"माई मी फ्रेश होऊन येते मग सगळं काही सांगते "

"माई तो पर्यंत मस्त पैकी चहा कर ना मग सांगू तुला आम्ही सगळं" 

"बरं बाबा या लवकर "

(माई काव्या आणि केवल हॉल मध्ये बसले )

"अगं माई अण्णा कुठे?" 

"अरे ते गॅलरी मध्ये आहेत "


"बरं माई आम्ही सारे सामान आणले आहे उद्या जे गावाकडे पदार्थ बनताना ते आपण सगळे उद्या बनवायचे आणि हो तुम्हला इथे बसता गावाकडच्या गणपतीचे दर्शन घेता येणार मोबाईल वरून त्यामुळे आम्ही इथे असलो तरी तिथला फील असणार अण्णाचा मूड ऑफ झाला ना गावाकडे जाता आलं नाही म्हूणन आम्ही हे ठरवलं आहे"

"खरंच गणपतीचं दर्शन होईल हो "

"वाह्ह देवा पावलास तू "

"पण हो अण्णा ना मात्र आपण सरप्राईझ दायचं सांगू नको आता "

"बरं बाबा त्यांना केवढा आनंद होईल माहित आहे "

(गणेश चतुर्थी चा दिवस उजडाला )

माई आणि काव्या किचन मध्ये बिझी होत्या तर हॉल मध्ये प्रोजेक्टर फिक्स करण्याचं काम केवल करत होता अण्णा आपले निराश होऊन गॅलरी मध्ये बसलेले 

तेवढ्यात केवल ने सगळयांना बाहेर बोलावले 

"अण्णा पहा मी कांय दाखवतो ते "

केवल ने मोबाईल प्रोजेक्टर ला कनेक्ट केला आणि क्षणात गावच्या गणपती दर्शन स्क्रीन वर झळकलं 

"अरे हा तर आपला गणपती ना रे "?

"हो अण्णा तो बघा सदा तुम्ही घर बसल्या गणपतीचं दर्शन घेऊ शकत आणि त्याच्याशी बोलू हि शकता तुम्ही या वर्षी न जाता येणार म्हूणन उदास होता ना पण आता नाही तुम्ही इथे राहून तिथला फील जाणवू शकता "

"खरंच "

"हो बघा हा "

"सदा आवाज येतो ना रे ?"

"हो केवल सांग"

"अण्णा काय म्हणता ते बघ "

"अण्णा बोला" 

"आणलास काय रे गणपती"

"हो अण्णा तुमची कमी जाणवणार होती पण केवल ने हि आयडिया मला दिली आता कसं सगळेच सोबत असल्या सारखं वाटत "

"हो रे बाबा मी तर निराश झालेलो पण हि जादू झाली चल पूजा कर लवकर बाप्पाला भूक लागली असेल" 

"हो अण्णा" 


(स्क्रीनवरच्या बाप्पाची सगळ्यांनी मनोभावे पूजा केली आणि गावाहून आणि इथून सुखकर्ता दुःखहर्ता च्या आरतीला सुरवात झाली स्क्रीनवरच्या बाप्पाला इथून पंच पक्वानाचा अण्णांनी नेवेद्य दाखवला आणि देवाच्या आशीर्वादाने सहभोजन पार पाडले )

"काय अण्णा खुश ना "

"हो तर जाता येणार नाही म्हणून खंत वाटत होती पण तू करून दिलंस दर्शन देवा माझ्या खंतेच निवारण गेलस रे बाबा आणि पंचपक्वान्नाचा बेत पण छान झाला सगळं काही गावाकडे असेलल्या सारखं ह्या साठी तुला आणि सुनबाई ला मानलं पाहिजे "

"काय हो अण्णा मला कशाला माईंनी मला मदत केली 

"मदत केली मी पण एवढ्या पदार्थाची जोखीम उठवणं काही खायची गोष्ट नाही आणि माझी कसली मदत तूच तर सगळं केलस "

"अहो माई अण्णा आम्ही काहीच केलं नाही सगळी त्या गणरायाची कृपा 

"बोला "

"गणपती बाप्पा मोरया 

मंगलमूर्ती मोरया"


Rate this content
Log in