akshata alias shubhada Tirodkar

Others

3  

akshata alias shubhada Tirodkar

Others

नववर्ष पूर्व संध्या

नववर्ष पूर्व संध्या

2 mins
242


"राजू ये राजू कुठे गेलास चहा घे बघ "

"आलो आलो "

"कुठे गेला होतास"

"अगं बाहेर च होतो त्या समोरच्या घरात दरवर्षी प्रमाणे नवीन वर्षाची पार्टी ची तयारी चालू आहे रोषणाई केली आहे मोठे मोठे स्पीकर लावले आहे आणि कोण कोण पाहुणे येत आहे त्याच आपलं बरं आहे पार्टी आणि काय मज्जा"

"माफ कर बाबा आपण नाही करू शकतो त्याचा सारखी पार्टी त्याच्या सारखा खर्च आपल्या खिशाला परवडणारा नाही पोरा आपल्या साठी कसलं नवीन वर्ष आणि काय वर्षाचे फक्त आकडे बदलतील आणि काय आपलं नशीब थोडेच बदलणार आपल्या परिस्थीती ने आपल्याला मजबूर केलं आहे माहित आहे तुला वाईट वाटत असेल पण मी तुला ह्या भाकरी आणि चटणी शिवाय महागडे खाणं नाही देऊ शकत "

"आई तू वाईट वाटून घेऊन नकोस मला नको ते महागडं खाणं त्या पेक्षा हि आपली चटणी आणि भाकरी बरी आणि मला माहित आहे तू किती कष्ट करते माझ्यासाठी दिवस रात्र एक करते कारण ,मला चांगले शिक्षण मिळावे आणी मी खूप शिकुन मोठे होण्यासाठी पण आई एक सांगतो उद्या सकाळी जर त्या काकू काही खाणे घेऊन आल्या तर घेऊ नको. गेल्यावर्षी त्या म्हणाल्या होत्या आमचे हे सांगत होते बाहेर फेकून दे मी च म्हणाले तुम्हाला देऊया जर त्यांना द्यायचे असते तर आता देऊ शकतात उरले सुरले बाहेर टाकण्या सारखे आम्ही का खावे आम्ही गरीब असलो तरी एवढे हावरे नाही "

हे ऐकून आईच्या डोळ्यात पाणी आले "हे सगळं तु ऐकलं होतस किती मोठा झाला माझा मुलगा जो एवढा समजुतीने बोलतो नाही खरं आहे तुझं आम्ही गरीब असलो तरी स्वाभिमानी आहोत कष्टाचे खातो उद्या येऊ दे मी सांगणार आम्हाला नको आहे "

थोड्या वेळात दोघांनी भाकरी आणि चटणी खाल्ली बाहेर नववर्षाच्या स्वागताची तयारी चालू होती मोठ्या आवाजात संगीत ऐकू येत होतं 

आई आणी राजू झोपी गेले परत सकाळी उठून तिला घरकामासाठी जायचे होते तिच्या नशीबी नवीन वर्ष म्हणजे काहीच नव्हते तिच्यासाठी आपल्या राजुचे उज्ज्वल भविष्य हेच नववर्ष होत 



Rate this content
Log in