Exclusive FREE session on RIG VEDA for you, Register now!
Exclusive FREE session on RIG VEDA for you, Register now!

Sunita madhukar patil

Others


5.0  

Sunita madhukar patil

Others


नतमस्तक

नतमस्तक

3 mins 508 3 mins 508

   "अहो पप्पा ! बस झालं आता , किती कष्ट घेणार , आता तुमच आराम करायचं वय , शरीर साथ देत नाही तुमचं , किती करणार "... कालच माझं आणि माझ्या वडिलांचं वाजलं . पण ऐकतील तर शपथ ... माझे पप्पा वय वर्ष 72 . पण जोश एवढा की 25 - 30 वर्षाच्या तरुणाला लाजवेल असा... त्यांना पाहिलं की अस वाटत जस काळ्या आईच्या कुशीतुन एक लहान बाळ आत्ताच यथेच्छ मनसोक्त खेळून बागडून आलं आहे . ते मळ्यात शेतातल्या कामात इतके रमतात की त्यांना कशाचंच भान उरत नाही...लाल बहादुर शास्त्रींनी " जय जवान जय किसान " चा नारा दिला आणि तो ह्यांनी अगदी तंतोतंत आत्मसात केला...जवान आणि किसान हे आपल्या देशाचे अविभाज्य घटक आहेत...एक देशाचं रक्षण करतो तर दुसरा देशाचं पोषण...एकाच्या हाती बंदूक तर दुसयाच्या हाती नांगर ...

   माझे वडील , शेतकरी कुटुंबातील , घरच्यांच्या विरोधात जाऊन , पळून जाऊन आर्मीत भरती होतात...आणि भारतमातेच्या संरक्षणाची शपथ घेतात ... आर्मीची वर्दी आपल्या अंगावर चढवतात...ती वर्दी म्हणजे फक्त एक युनिफॉर्म नसतो...ती असते देशाबद्दलच्या प्रेमाच प्रतीक , केलेला त्याग आणि पवित्र भूमातेच्या प्रति समर्पणाचा भाव , आणि सुरू होतो त्यांचा एक नविन जीवन प्रवास...घरादार , आईबाप , भाऊबहीण, बायकापोरांपासून लांब राहून ऊन , पाऊस , वादळ , वारा सांर काही सहन करीत देशाच्या सीमेवर पहारा देणारा सैनिक पहिला की नकळत माझे हात जोडले जातात...मागील काही वर्षांपूर्वी सैनिक आपला परिवार सोबत ठेवत नव्हता...पण सरकारनी दिलेल्या काही सोयीमुळे आता परिस्थिती बदलली आहे...पण त्याच्या सोबत राहणं हे ही त्याच्या परिवारासाठी एक दिव्यच असतं..."विंचवाच बिऱ्हाड पाठीवर " ह्या म्हणीची अनुभूती नक्कीच त्यांना येत असते ... दोन ते तीन पत्र्यांचे काळे बॉक्स हाच काय तो त्यांचा संसार किंवा विश्वच म्हणा ना ! त्या काळ्या बॉक्स मध्ये गरजे पुरती भांडी , कपडे , जीवन उपयोगी थोडं समान बांधून निघतात आपल्या प्रवासावर ...

एखाद्या नवीन ठिकाणी जायचं , तिथलं वातावरण , तिथली माणसं , तिथली नवीन संस्कृती , सगळ्यांशी जुळवून घेता घेता दोन ते तीन वर्ष निघून जातात आणि आता कुठं स्थीरस्थावर होतंय अस वाटू लागलेलं असत तोवर हातात असते नवीन पोस्टिंगची ऑर्डर...चला ! परत सगळा संसार बॉक्स मध्ये पॅक करून निघतात नवीन प्रवासाला , नवीन माणसात , नवीन संस्कृतीत , विंचवासारखं बिऱ्हाड पाठीवर घेऊन...

   माझ्या वडिलांनी 24 वर्ष इंडियन आर्मीत घालवली...

आणि रिटायरमेंट नंतर शेती करण्याचा निर्णय घेतला...शेती करणं पण सोपं काम नाही...शेती म्हणजे निसर्गावर अवलंबून राहणं आलं...निसर्गाचा लहरीपणा , आडमुठेपणा, कधी पाऊस तर कधी दुष्काळ या सगळ्यांना तोंड देता देता हिम्मत साथ सोडत असते...कधी निसर्गाने साथ दिलीच तर शेतमालाला योग्य भाव न मिळणं ह्या सगळ्या समस्या असतातच...तरीही मोठ्या हिंमतीने देशाच्या पोषणाची जवाबदारी शतकऱ्याने आपल्या खांद्यावर उचललेली असते...

   देशाचं रक्षण आणि पोषणाची जवाबदारी घेतलेले सैनिक आणि शेतकरी बघितले की मी आपोआपच नतमस्तक होते...

   शेतकरी आणि सैनिकांसोबतच आपल्या जीवनात आपल्या आजुबाजूला असे अनेक लोक असतात त्यांचा जीवन प्रवास बघितला की आपोआपच माझ्या मनात त्यांच्या बद्दल आदरभाव वाढतो...

  " सद्रक्षणाय खलनिग्रहणाय " हे ब्रीद वाक्य घेऊन दिवस रात्र सणासुदीची सुट्टी न घेता असामाजिक तत्त्वांशी लढा देणारा समाजाच्या शांततेची घडी विसकटु न देणारा पोलीस बघितला की मी नतमस्तक होते...

  हा निसर्ग जो आपला खळाळत पाणी , जीवन देणारी हवा , माती , ऊन , पाऊस , झाड , वेली रुपी मौल्यवान ठेवा आपल्यावर निर्मळ पणे , निर्हेतुक पणे उधळत असतो , या निसर्गाच्या सानिध्यात गेले की मी नतमस्तक हॊते...

  सकाळी सकळी घंटागाडी घेऊन आजूबाजूचा परिसर साफ करून कचरा गोळा करणारा सफाई कर्मचारी बघितला की परिसरासोबतच माझं मनपण लख्ख उजळतं आणि मी त्याच्या पुढे नतमस्तक होते...

   आई बाबांच्या बरोबरच मुलांना घडवणारे त्यांच्यावर योग्य संस्कार करणारे आणि शिक्षणाची तळमळ मुलांच्यात निर्माण करणारा शिक्षकवर्ग बघितला की माझे हात जोडले जातात...

   अश्या अनेक दिव्य विभूती आपल्या समाजात आहेत , ज्यांची प्रचिती आपण पावलोपावली अनुभवत असतो , अश्या सर्वांचे ज्यांचा माझ्या जडणघडणीत , माझ्या प्रगतीत , माझ्या उत्कर्षात मोलाचा वाटा आहे त्या सर्वांचे मी आभार मानते...


Rate this content
Log in