निराशा नाही त्या पावलाला...
निराशा नाही त्या पावलाला...


अवजड पावलांचे निसटते पाऊल
पुढे जाण्यासाठी वळलेच नसते तर
खिळलेले पाऊल पुन्हा मागे फिरले असते
नसत्या उठाठेवीचा वैरी हसत-खेळत
चालता झाला असता नव्या पावलांनिशी
पुन्हा माघारी न अनुभवता नवं विश्वरूप
पण सत्यता यापल्याड असते अंधारी
आपल्या
अस्तित्वाचा मार्ग शोधता शोधता
प्रकाशच हरवला जातो अंधारात जणू
पण ते पाऊल पडलं जरी असलं चुकीचं
तरीही आपलं सतत धाडसानिशी लढणं
निराशा उरतच नाही आता चुकीच्या दोषाला
तरीही असतो प्रयत्न मिळावी नवी दिशा
आशेचा किरण प्रकाशित व्हावा जोमाने
अंती मिटावी निराशा उद्दिष्टाच्या तेजाने