नातं काहीसं खास...
नातं काहीसं खास...
1 min
642
नको असतं भांडण.....
पण कधी होतं सहज
कधी उगाच न पटणार
न सांगणं नाही जमत
मन मोकळं नाही केलं
तर ओझं वाटतं कुणाचं असणं
मग फुटतात कधी रागाचे फुगे
पण योग्य तिथेच आपुलकीपायी
फुग्यातली हवा काही
अशीच नसते रिकामी
तिलाही असते जोड काळजीची
नि हक्क गाजवण्याची
त्याचं काय असतं ना.....
नात्यातलं हेच असतं खासपण !
