STORYMIRROR

akshata alias shubhada Tirodkar

Others

3  

akshata alias shubhada Tirodkar

Others

मुले आणि सुख

मुले आणि सुख

3 mins
311

देसाई काका माॅनिग वाॅक करुन परतत होते तेवढ्यात त्यांना हाक ऐकू आली मागे‌ वळुन पाहिले तर त्याच्या ओळखीचे सावंत होते


"काय देसाई तब्येत कशी आहे ?"

"अरे सावंत मस्त "

"अहो तुम्ही नुकतेच एका मोठ्या आजारातून उठला आहात तर थोडी विश्रांती ह्या असे सकाळी सकाळी बाहेर का पडलात "?

अहो सकाळची हवा आरोग्य साठी चांगली असते म्हणून बाहेर पडलो आणि घरात बसलो तर आणी आजारी वाटत "

"ते ही खरं पण तुम्ही जपा काय आहे ना वहिनी ना त्रास होईल तुमचा मुलगा काय तुम्हाला पाहात सुध्दा नाही तो बसला तिथे अमेरिकेत माफ करा पण जे सत्य आहे तेच बोलो "

"मी कोणावरही अवलंबून नाही आहे कि तो मला पाहिलं वैगरे माझे हात पाय शाबूत आहेत "

"तसे नव्हे हो पण मुलाचं सुख पण हवं ना एवढे कष्ट करून मोठा केल्यावर अपेक्षा हि असते ना "

"सुख का मी आता सुखी नाही आहे का माझ्या पत्नी बरोबर मी सुखी आहे आणि कसल्या सुखाची अपेक्षा मी ठेवत नाही "

"तुम्ही एवढ्या सहज कसे बोलू शकता "

"बरं सावंत निघतो मी"

"ह्यांना कशाला हव्या नसत्या चौकश्या म्हणे मुलाचं सुख "


देसाई काका बडबडत घरात शिरतातात 

"काय हो काय झाल "?

"काही नाही येतो मी फ्रेश होऊन सोबत चहा पिऊ "

"वव्वा तुच्या चहाचा वास म्हणजे मन कसं प्रसन्न होत "

"माझी वाहवा पुरे पटकन नाश्ता करा औषध पण घ्याची आहेत "

"अंग सतत औषध औषध करत नको राहू मला आजारी असल्या सारखं वाटत "

"मग एवढ्या मोठ्या आजारातून उठला ते काय कमी आहे माझा तर जीव तर टांगणीला लागला होता देव पावला म्हूणन सांगा तुमच्या शिवाय मी विचार ही नाही करू शकत आधार देणाऱ्याने तर पाठच फिरवली"

"कशाला तो विषय काढतेस आणि आपल्याल्या कशाला आधार हवा आपण एकमेकांसाठी समर्थ आहोत ना "

"अहो पण आपलं वय त्याच काय ह्या थरथथरत्या हातांना प्रेमाचा आधार नको का त्याच्या साठी आपणं एव्हडं केलं आणि त्याला आता इथे यायला हि वेळ नाही अमेरिकेत उच्च पदावर आहे पण काय फायदा आम्हला मुलाचं सुख म्हतारपणी मिळावं असं प्रत्येक आई वडिलांना वाटत त्या त्यात चूक काय सांगा ना कि आम्ही त्याच्यासाठी किती त्रास सहन करून त्याला शिकवलं त्याच सुख त्यानी हे दिले "

"म्हतारपण म्हणजे मुलांकडून अपेक्षा असं असत का तो वाटेत सावंतपण असच काही बोलत होता मुलाचं सुख नाही वैगरे "

हो का म्हणून तुम्ही येताना जरासे चिडलेले होतात मग काय वाईट बोले ते कुठे आहे आपल्याला आपल्या मुलाचं सुख"

"सुख म्हणजे नक्की काय सांगू शकते तू नाही ना आपण खुश असतो तेव्हा आपण आप्ल्याला सुखी म्हणतो पण सुख म्हणजे नक्की काय आहे आता आपलंच बघ ना आपलं लग्न झालं आपण प्रत्येक क्षणात सुख अनुभवलं आपल्या मुलाचा जन्म झाल्यावर फक्त त्याच्या सुखाचा विचार केला पण तेव्हाही आपलं सुखी आयुष्य होत तो मोठा झाला अमेरिकेत नौकरीत एव्हडा रुळला कि त्याला ते सुख मिळालं आपला विसर पडला आता त्याला आपली आठवण नाही म्हूणन रडत बसायचं कि आपलं आयुष्य आपण जगायच सांग ना आपण एकमेकांबरोबर खूप सुखी आहोत मग कशाला उगीच मनाला घोर लावून बसायचा आपण ह्या वयातही एकमेकांच्या सहवासात सुखी आहोत कि नाही मग झालं ना आपलं स सुखी आयुष्य मग कशाला हवं आपल्याला न मिळणाऱ्या सुखाची अपेक्षा आहेत ते दिवस मजेत घालवू या "

"बरोबर आहे तुमचे" 

दोघाचे डोळे पाणावले 


Rate this content
Log in