मुलांची खोडी
मुलांची खोडी


वर्ग भरला, प्रार्थना झाली. गाणे झाले. गोष्ट सांगितली.
आता अभ्यासाला सुरुवात झाली. गणिताचे दोन प्रश्न सोडवून झाले.
युवराव मोरे हा मुलगा हळूच माझ्याकडे आला. आणि बोलायला लागला."बाई, मी कानात कागद घातलाय " मला पटकन समजेना हा काय बोलतोय. मी परत विचारले "काय म्हणालास?"
त्याने परत तेच सांगितले.मी त्याचा कान तपासला. तर अगदी आतपर्यंत कागद गेला होता. तो म्हणाला "बाई,दुसऱ्या पण कानात घातलाय."आता मला दडपण आले. काय करावे आता.पटकन त्याच्या पालकांना फोन केला. त्यांनी फोन उचलला नाही. मी जरा टेंशन मधेच आले.
त्यांचा फोन आला जरा बरे वाटले. त्यांना मुलाची खोडी सांगितली.कारण काय होते.. ते ऐकून तर मला आश्चर्य वाटले. त्याने सांगितले " मला मुलांचा आवाज खूप येत होता म्हणून मी कानात कागदी बोळे घातले."
मला हसू पण आले..
इतका त्याला त्रास होतोय का? बर कान पाहिले तर कागदी बोळा कानात पाहून भीती वाटली. पालकांना लगेचच ड्रॉ. कडे जायला सांगितले. इतर मुलांकडून त्याचे दफ्तर भरून घेतले.
तो ड्रॉ. कडे जावून आला.पण परत शाळेत आला. याचे मला कौतुक वाटले . जसे काही झालेच नाही या अविर्भावात तो वावरत होता.
लहान मुलांकडून हा गुण मोठ्या माणसांनी आत्मसात करावेत. त्याचे अनुकरण करावे. म्हणजे जीवनातील वाद कमी होतील.
वागूया असे की वाद झाले तरी दुसऱ्या मिनिटाला झाला तो वाद विसरूया.. आनंदाने जीवन जगूया...
झाले गेले विसरून जावे
पुढे पुढे चालावे... हा गुण शिकण्यासारखा आहे.