मन दाह...
मन दाह...

1 min

368
दुखावलेल्या मनाला
मायेची घालावी फुंकर
'जरा धीर धर' असं
सांगावं कधी समजावून
धगधगत्या रागरूपी
अग्नीचा सळसळता दाह
क्षणात शमवावा काहीसा
प्रेमाने नि लडिवाळपणे
निराशतेच्या आत्मदाही
अनपेक्षित जखमेला
आपुलकीच्या मलमाने
गोंजारावे कधी मायेने