मी आणि चिमणी
मी आणि चिमणी

1 min

458
घरातल्या घरात एक नवीन जग तयार झालं, रोज घड्याळाच्या काट्यावर धावणारी आई घरी दिसू लागली. चिमणा जीव खुश दिसत होता, आई तू खेळ, आपण खेळू लपाछपी. मनात माझ्या वेगळेच लपंडाव घेत होते डाव. तनाने मी खेळत होते तिच्यासोबत पण मन मात्र रोज जात होते शाळेत, मुलामध्ये रमणाऱ्या टीचरला वर्क फ्रॉम होम जरा जिकिरीचे वाटू लागले. या कोरोनाच्या भीतीने साऱ्या जगाला ग्रासले कधी विचारसुद्धा केला नव्हता देवाघरची फुले लॉकडाऊनमध्ये बसतील. प्रत्येक पिढीजवळ असतं एक शहाणपण माझ्या चिमणीने समजावलं तू आई आहेस, तू टीचर आहेस, आलेल्या परिस्थितीला सामोरं जावंच लागेल, आपलं दार बंद ठेऊन मनाची कवाडं उघड, कोणत्याही परिस्थितीत हादरू नको कारण तू आई आहेस.