Varsha Shidore

Others

3  

Varsha Shidore

Others

म्हातारपणातलं तरुण प्रेम

म्हातारपणातलं तरुण प्रेम

1 min
407


म्हातारं तर आपलं शरीर होत असतं   

सुरकुत्या चेहऱ्यावर दिसतात बोलक्या  

प्रेमावर कसला आलाय वयाचा शिक्का 

हृदयात अजूनही स्थान कायम काळजीचं 

सरत्या वात्सल्याचं मायबाप एकमेकांचं  

जुने दिवस आठवून खळखळून हसण्यात 

रोमँटिक गाण्यावर तारुण्य डोलण्यात 

निखळ प्रेम आजारपणातल्या सुश्रूतेत

एकदुसऱ्याचा एकटेपणा घालवण्यात

रागाच्या उद्रेकाचा कानोसा आधीच घेण्यात  

नि मुकाट्याने राग बोल ऐकत राहण्यात  

कुणाविना सहखुशीत एकमेका जपण्यात

काळजातली भेग आधाराच्या काठीत 

आनंद जगण्यातला एकमेकांच्या डोळ्यात 

दिवसेंदिवस वाट सुखातली न्याहाळण्यात 

डोळ्यातल्या अश्रूंचं आनंदवन करण्यात 

म्हातारपणातलं अधासी जिवंत तरुण असं प्रेम


Rate this content
Log in