Varsha Shidore

Others

3  

Varsha Shidore

Others

मायेची उब...सतत सुखावणारी

मायेची उब...सतत सुखावणारी

2 mins
395


प्रत्येकाने कधी जगलेलं एक मनस्वी स्वप्न 

घर असावं...तर दिलखुलास हसतं-खेळतं 

हौशीनं बाहेरून सुशोभित केलेलं सुंदर घर 

आतल्या खोल्यांच्या चार भिंतींचं नाही फक्त 

आपुलकीच्या मायेनं दिलेला मुलामा तो 

अभिमानाने वेळोवेळी करायचा सुगंधी 


अंगणात सडा जणू रसाळ नात्यागोत्यांचा 

रांगोळीतले रंग त्यातला अकल्पित गोडवा 

आपल्या माणसांच्या आनंदाचं आकर्षक तोरण 

सुख-दुःखांच्या फुलरूपी माळांनी सजलेलं 

निखळत्या हास्यानं भिंतीत जीव ओतणारं 

घर एकजुटीने एकत्रित बांधणारं अर्थसंकल्प


घराचं घरपण जपणारं सहकुटुंब आपलं 

भावनांना समजून घेणारं असं प्रत्येक नातं 

त्यात आभासी नात्याचं जडपण नाही कधी 

मनाचा मोठेपणा जपणारे सगळेच हवेहवेसे 

प्रत्येक नाती कसोशीने टिकवणारं संशोधन 

नाती गुण्यागोविंदाने सतत फुलवणारं तंत्रज्ञान 


सहनशीलतेचा दागिना समजूतदारपणाचा 

चुकांना विसरभोळेपणाची अनोखी जोड 

मत मांडण्याचा एकसमान सर्वाधिकार 

वर्चस्वाचं नाही असह्यकारी अंधारी पांघरून 

वादविवादांचं नाही कधी ताटातुटीत रूपांतर 

तर्कशुद्ध हेतूंनी प्रसन्नतेनं वाढलेलं कुटुंब


उत्साही श्वास घेणं मनमोकळं नि स्वच्छंदी 

आपापसातला संवाद कैद समाधानी हास्यात 

फोटोफ्रेम निमित्त नाही फक्त सजावटीचं 

आठवणींचा दुर्मिळ खजिना वात्सल्य प्रेमाचा

होरपळून निघालेल्या जीवाचा ताण मिटवणारी 

मायेची उब मिळावी...सतत सुखावणारी


Rate this content
Log in