मानसिकता ...
मानसिकता ...


"आजी काय झालं मघास पासून मी पाहते तू कुठल्यातरी विचारात अडकलीस आहे" मानसीने काळजी पोटी आजीला विचारले "काही नाही बाळा आज चे मी पहिले ते माझ्या डोक्यातून जात नाही"" काय झालं आजी"?
" अग काय सांगू आज मी बाजारातून येताना बस मध्ये माझ्या शेजारी एक मुलगा बसलेला असेल तो अकरावीत वगैरे ...त्याने कानात ते इअरफोन ते काय घातलेले आणि तो गाणे पाहात होता.. काय ते गाणे ऐकायला काय येत नव्हते पण जे तो पाहत होता, ते पाहून मला कस तरी वाटलं एक मुलगी नाचत होती आणि काय ते अंगप्रदर्शन कुठे चालली आहे आजची पिढी?"
"अग आजी त्यात काय एवढ आज काल चा ट्रेंड आहे असल्या गाण्याचा आणि आजकाल हेच चालत आणि त्याच कामच ते मग त्यात काय एव्हडं "
"कसला ट्रेंड आणि हेच चालत म्हणजे अंगप्रदर्शन चालत ट्रेंड म्हणता हा कसला ट्रेंड, जेथे वाईट संदेश दिला जातो स्त्री किंवा मुलगी काय शोभेची वस्तू आहे कि तिला असं नाचवलं जात, काय येणाऱ्या पीढीला तुम्ही सांगू इच्छिता कि महिलांचा आदर करा कि असे तिला नाचताना पहा???
"आजी कूल डाउन आजकाल सिनेमे अशाच गाण्यावर चालतात आणि हिट होतात. "
"हे कोणी ठरवलं आम्ही च ना आणि सिनेमा म्हणजे फक्त गाणं नसत. कथा, अभिनयाशिवाय काय असेल सिनेमा? कथा चांगली असेल तर कशाला गरज पडेल अश्या गोष्टीची"
"पण आजी आजकाल अश्या गोष्टी असल्याशिवाय सिनेमे नाही बनत एक तरी आयटम सॉंग्स असतंच "
"का आपल्या सिनेमाच्या खजिन्यात एवढे सिनेमे आहेत जे अजरामर आहेत. फक्त त्याच्या कथे आणि अभिनयामुळे मग कसली गरज मनोरंजन म्हूणन तुम्ही अश्या गोष्टी करता पण त्याचा वाईट परिणाम होतो कि नाही सामान्य मुलींना किंवा स्त्रियांना ह्याचा त्रास होतो कि नाही वाईट नजरा त्याच्यावर पडतात ना?"
आजी तू म्हणतेस ते मला पटतंय पण ते त्याच काम आहे अभिनय करणे आणि आपण थोडंच बदलू शकतो हे
पेक्षा" बरोबर आहे आजी तूच प्रत्येकाने विचार करायला हवा मनोरंजनाच्या नावावर आपण जे पाहतो ते बरोबर आहे कि वाईट ह्याची वाचा फोडली पाहिजे"
आणि त्याचं वेळी मानसीने इंस्टग्रामवर फाइट अग्नेन्स्ट रॉंग ग्रुप केला .....