माझे आवडते ठिकाण
माझे आवडते ठिकाण
इवल्याशा माझ्या त्या वयाला बालवाडीत जाण्याची सवय लागलेली पण आई बाबांचे मला शाळेत पाठवण्याचे कानी पडले आणी मनाला थोडे मोठे झाल्या सारखे वाटले. आई बाबासह अॅडमिशन साठी माझी स्वारी तीन मजलया इमारतीत शिरली , तिथे माझ्या सारखे छोटे दोस्त आपल्या आई बाबा बरोबर आले होते एका रूम च्या बाहेर ख्रुच्या ठेवण्यात आल्या होत्या एक एक करून आत सोडण्यात येत होते आमचा नंबर येईपर्यंत मी आईच्या मांडीवर बसणे पंसद केले आमचा नंबर आला तसा आम्ही एक दरवाजा ढकलत आत गेलो समोर चष्मा लावलेल्या बाई बसल्या होत्या त्यांना पाहून मला थोडी भीती वाटली त्यांनी आई बाबा ना बसण्यास सांगुन माझ्याकडे पाहिले त्याचा नाकावर आलेला चष्म्यामुळे त्याचा चेहरा मला सांता कलौस प्रमाणे दिसू लागला त्यांनी मला सरळ प्रश्न विचारला
"नाव काय तुझे"?
आईने मला पहिलीच सांगून ठेवलेले नाव सांगताना पूर्ण सांगावे तसे मी पूर्ण नाव सांगितले समोर विविध चित्राचा तक्ता होता त्यातल्या एका तक्त्यावर बोट दाखवून हा कोण विचारण्यात आले
मी लगेच उत्तर दिले "ससा"
कारण बालवाडी "ससा तो कसा "हे गाणे आम्हला चित्र दाखवून शिकवलेले त्यामुळे त्या पांढऱ्या रंगाच्या प्राण्याला मी लगेच ओळखले तसे बाईनी मला पाहून
'वाह छान" म्हणाल्या
आई बाबा नाही प्रश्न विचारण्यात आले आणी माझ्या शाळेच्या प्रवेशावर शिकामोर्तब झाला आणी आम्ही बाहेर पडलो वाटेत टेलर कडे मला उभे करून नव्या गणवेशासाठी मापे काढण्यात आली आणी आम्ही घरी परतलो
जसे दिवस जात होते मला त्या तीन मजली इमारतीत मी कुठे हरवणार तर नाही ना ह्याची भीती वाटू लागली पण आई नेहमी समजावून सांगत असे कि
"तिथे तू एकटीच नसणार तुला नवे मित्र मैत्रीण मिळणार खेळायला "
शाळा सुरु वाहायला अवघेंच दिवस होते तसे आई बाबा नि माझ्यासाठी नवीन बॅग ,पाटी ,वॉटर बॉटल ,रेनकोट ची खेरदी केली येताना टेलर कडून माझा नवीन गणवेश घेऊन आले आणि मग मला तो नवा गणवेश चढवला हेतू एव्हडाच होता कि मला परफेक्ट होतो कि नाही आणि परफेक्ट अशी आई कडून दाद आली आणि तो उतरवला केला
आणि तो दिवस उजडाला आमच्या शाळेत प्राथमिक वर्ग दुपारचे भरायचे पण आई माझी तयारी सकाळ पासूनच करत होती १२ वाजता तिनी मला जेवण भरवले आणि गणवेश चढवला आपण हि तयार होऊन माझ्या गळ्यात ढोल घालतात तशी वॉटर बॉटल घातली आपल्या हातात माझी बॅग घेऊन आमची स्वारी शाळेच्या दिशेने निघाली
शाळेच्या पटांगणात माझ्या वयाची तसेच कपडे घालून कोणी आईचा तर कोण बाबाचा हात धरून उभे होते मधेच कोणाचा रडण्याचा आवाज हि येत होता आम्ही त्या घोळक्यात शिरलो तश्या एक बाई आल्या
"पहिली च्या मुलांनी असे रांगेत उभे "राहा म्हणल्या
तसे आमच्या पालकांनी आम्हला रांगेत उभे केले आणि त्या पुढे आणि आम्ही मागे रेल्वे सारखे त्याच्या मागो मग चालू लागलो त्यांनी आम्हला एका वर्गात नेले आणि दरवाजा बंद केला तशी रडारड सुरु झाली मला हि त्याना पाहून रडू येत होत पण खिडकीतून मला आई दिसत होती १ तासाने शाळा सुटणार होती म्हणून सगळे पालक बाहेरच होते
बाईनी 'चांदोबा चांदोबा "हे गाणे म्हणाल्या सुरवात केली तशी हळूहळू रडारड थांबली मग प्रत्येकाला नाव सांगण्यास सांगितले वातावरण तसेच राहावे म्हणून बाईनी "अकुबाई डकूबाई " हे गाणे नक्कलसह करण्यास सुरवात केली आणि हास्याचा खळखळाट सुरु झाला आणि घंटा वाजली तसे आम्हला रांगेत उभे केले आणि प्रत्येकाच्या पालकाच्या हाती सोपले आई ने माझा हात पकडला आणि आम्ही घरी परतलो अश्याप्रकारे माझ्या शालेय जीवनाचा श्री गणेशा झाला
पुढे दिनक्रम सुरु झाला १.३० वाजता शाळा प्रार्थनेने सुरु व्हायची ३.३० वाजता मधली सुटी त्यात कधी एकदा डब्बा संपून खेळायला जातो असे व्हायचे शाळेच्या पटांगणात पकडा पकडी, लुपा छुपी,डोंगर कि पाणी चा खेळ रंगायचा ५.३० वाजता शाळा सुटली कि आईची गळाभेट व्ह्याची मग घरी पोहचे पर्यत गप्पा गोष्टी चालू असायच्या आजही दे दिवस आठवले कि आपणच हसू फुटते .
अशीच वर्ष गेली आणि मी माध्यमिक वर्गात पोहचले आता मात्र लवकर उठावे लागे ८.३० वाजता शाळा असेम्ब्ली ने सुरु व्ह्याची ११.३० वाजता इंटर्वल त्यात मित्र मैत्रीबरोबर डबा खात गप्पात जायचा १.३० वाजता शाळा सुटली कि कधी एकदा आईच्या हातचे स्वादिष्ट जेवण जेवते आणि ओरडणाऱ्या पोटातल्या कावळ्याना शांत करते असे व्हायचे
माझ्या माध्यमिक शिक्षणास सुरवात झाली नवं नवीन विषय समोर आले हिस्टरी ,गेओग्राफय ,मॅथ्स ,सायन्स आणि बरेच कधी कधी एव्हडा अभ्यास करून कंटाळा यायचा नको ती शाळा नको अभ्यास कधी एकदा मोठे होऊ असे वाटायचे पण आता ओठी मात्र लहानपण देगा देवा हेच येत
आमच्या शाळेत दरवषी विविध स्पर्धा घेतल्या जायच्या आणि त्याचे बक्षीस स्नेहसंमेलनाला प्रमुख पाहुण्याच्या हस्ते दिले जायचे पाचवी सहावीत मी भीती पोटी भाग घेतला नाही पण दुसऱयांना बक्षीस घेताना पाहून मात्र वाटे आपल्यला हि असे बक्षीस मिळाले तर मग ७वी पासून १० वी पर्यंत बक्षिसांचा असा सपाटा लावला आणि आई समोर असताना बक्षीस घेण्याचा आनंद काही वेगळाच होता
शाळेत मॉनिटर होणे म्हणजे आमदार झाल्या सारखे मला हि पदवी एकदा नाकारत असताना हि माझ्या आवडत्या बाईनी माझ्या गळ्यात घातली मग बाई नसताना वर्ग सांभाळणे कोण बोलत असेल तर फळ्यवार नाव लिहिणे जेवढे बोले तेवढ्या खुणा करणे त्यात मग आपल्या मित्र मैत्रींणी ना सुद्धा थोडा वेळ विसरावे लागे काही जण तर लोणी लावण्यात पटाईत होते पण मी मात्र लाच न स्वीकारता माझ्या पदवीचा काळ पूर्ण केला
आज हि ती गोष्ट माझ्या लक्षात आहे मी पांचवीत होते आणि आम्हला हिंदी चा गृहपाठ दिला होता तो मी घरी जाऊन पूर्ण हि केला होता वेळापत्रकाप्रमाणे बॅग भरून मी शाळेत पोहचले हिंदी चा तास सुरु झाला सरानी गृहपाठ दाखवा असे सांगितले तसे मी उत्सहात वही बॅग मधून काढली आणि उघडताच क्षणी मला धस झाले कारण माझ्या हातात मराठी ची गृहपाठ वही होती मी अख्खी वही चाळली तर हि मराठीची वही आहे हि खात्री पटली बॅग मध्ये शोधाशोध केली पण वही चा पत्ता नाही तो पर्यंत माझा नंबर आला होता आणि ज्यांनी गृहपाठ केला नव्हता ते उभे होते खरे सांगण्यास मला हिम्मत नव्हती त्यामुळे मी डोळे पुसत पुसत पूर्ण तास उभी राहिले त्याचे झाले असे दुसऱ्यादिवशी फक्त हिंदी चा तास होता मराठीचा नाही आणि दिसायला पाठी मागून त्या वह्या सेमच होत्या गृहपाठ करून हि मी त्या दिवशी शिक्षा मात्र भोगली
खूप साऱ्या आठवणी आहेत शाळेतल्या ज्या संपता संपणार नाही असेच वर्ष पुढे केली आणि मी दहावीत पोहोचले दहावी म्हणजे यशाची पहिली पायरी आणि शाळेचा निरोप घ्याचा असे ते वर्ष
आज हि आठवतो तो आमच्या दहावीचा निरोपाचा दिवस (सेंडऑफ )नवीन कपडे घालून आम्ही दहावीतली मुले शाळेच्या सभागृहात जमली होती कार्यक्रम सुरु झाला होता पण माझी नजर शाळेच्या भितींना पाहत होती मी एवडीशी ह्या शाळेत दाखल झाली होते आणि आज मोठी होऊन बाहेर पडत होते पण शाळा मात्र तिथेच होती आपल्या कवेत आम्हा सर्व मुलाना एव्हडी वर्ष सांभाळत आज आम्हला आपल्या घरट्यातून भावी आयुष्यासाठी निरोप देत होती मी कंटाळून लहान असताना कधी कधी शाळेत न जाण्याचा बहाणा हि केला होता पण आज इथेच बसून राहावे असे वाटत होते कार्यक्रम संपला आणि आपल्या आवडत्या शिक्षक आणि शिक्षिकांसोबत फोटो काढण्यासाठी गर्दी झाली आम्हा सर्व दहावी वर्गाचा फोटो काढण्यात आला आणि आम्ही सगळी बाहेर पडलो पटांगणात राहून मी शाळेला डोळे भरून पहिले आणि घरची वाट धरली
आता मात्र शाळा खूप बदली आहे नवीन सुविधा सह ती उभी आहे नवीन रंग तिने आपल्यावर चढवला आहे तरीही तिला पाहतच आपलेपणा वाटतो दुःख एवढच वाटते कि आता मी तिची विद्यार्थिनी नाही तिच्या कवेत ती मला परत घेऊ शकत नाही अशी माझी शाळा जी गोव्यातल्या प्रसिद्ध म्हापसा शहरात आहे जिला" न्यू गोवा हायस्कूल म्हणून ओळखले जाते 'आता तर तिने आपले नाव हि बदले आहे खरेच विद्देचे मंदिर म्हणजे "जी एस आमोणकर विद्या मंदिर "
मन अभिमानाने भरून येते की तुझ्या विद्येची छत्रछाया मला लाभली.
