STORYMIRROR

Ashvini Duragkar

Others

3  

Ashvini Duragkar

Others

#माझा आवडता कार्टून... मोगली

#माझा आवडता कार्टून... मोगली

1 min
457

 किती छोटे छोटॆ ते किरदार. खरच असं होऊ शकत काय? कोणी कस जंगलात हरवू शकत. जंगलात राहू शकत. सगळंच किती अद्भुत वाटायचं ना लहानपणी. त्या आठवणीच खूप अविस्मरणीय होत्या. किती मजेदार वाटायच. आपण सगळेच मोठ्या कुतूहलाने कार्टून बघायचो आणि एका नयनरम्य जगाची सैर करून यायचो. 

    एक तान्या मानवी मुलगा अपघातात जंगलात हरवतो. त्याचे पालनपोषण एका लोमडीचे कुटुंब करते. त्याचा गुरु बिबट्या असतो त्या जंगलात सगळेच त्याचे शुभचिंतक असतात. पाहता पाहत आपण अक्षरशः हरवून जायचो. किती ना शिकण्यासारख्या होत त्या प्राण्यांना कडून. एका दुसऱ्या जातीचा व्यक्ती त्यांच्या जंगलात येतो. ते त्याला मोठ्या लाडाने वाढवतात. त्यातच त्याच सौख्य असत. जंगलातील प्राणीच त्याच्या घरचे सदस्य असतात. 

    हळूहळू तो त्यांची भाषा शिकतो आणि त्यांच्या सारखाच वागतो. म्हणतात संगत तशी पंगत. आपण मनुष्य प्राण्यात राहतो आणि त्यांच्या सारख बनतो पण मोगली जंगलात राहतो आणि त्यांच्या सारखा बनतो.  

किती ना अवर्णनीय प्रसंग अगदीच लहान्या पासन मोठ्यांच मन मोहून नेणार. तो हि आपलं

कर्तव्य जवाबदारीने सांभाळतो. जंगलच त्याच घर असते आणि प्राणी त्यांचे जिवलग. 

    


Rate this content
Log in