लोकमान्यांचे मनोगत
लोकमान्यांचे मनोगत
जून महिना सुरु झाला होता आणि गणेश चित्र शाळेत चिकट माती पासून भक्ती भावा ने गणरायाच्या सुबक अश्या लहान मोठ्या मुर्त्या तयार होऊ लागल्या होत्या रवी कोपकर एक सार्वजनिक गणपती मंडळाचा अध्यक्ष्य त्याने आपल्या कार्यकत्या सह चित्र शाळेत प्रवेश केला गेल्या वर्षी मंडळातर्फ़े मोरावर आरूढ असलेली मूर्ती बनवण्यात आली होती ह्यवर्षी काही नवीन संकल्पना घेऊन मूर्ती बदल ची माहिती चित्र काराला दिली आणि मंडळी इतर कामात व्यस्त झाली जुलै महिन्याच्या अखेरीस रंगोरंगोटी करून त्या मुर्त्या गणेश चित्र शाळेत विराजमान झाल्या बाजार पेठ्या हि गणरायाच्या स्वागतासाठी सजावटीच्या सामना पासून फटक्याच्या दुकानांनी भरून गेल्या मिठाई ची दुकाने हि लाडू मोदक करण्यात व्यस्त झाली प्रत्येक घरात खरेदी आणि साफ सफाई सुरु झाली रवी च्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी मंडप उभारण्यास कार्यक्रमाची जाहिराती वाटण्याची कामे हाती घेतली आणि पाहता पाहता भाद्रपद महिन्यातला तो आतुरतेचा दिवस उजाडला घरा घरात गणरायाचे आगमन झाले
एव्हडा दिवसाचा उत्साह मंडळाच्या कार्यकर्त्याच्या चेहेऱ्यावर झळकत होता. त्याच्या तर्फ अकरा दिवस गणेशाची मूर्ती बसवण्याचे आयोजिले होते हे मंडळ म्हणजे हौशी मंडळ दर वर्षी नवं नवीन उपक्रम करत असत २५ जणांच्या ह्या मंडळात सगळेच युवक होते त्या मंडळाचा अध्यक्ष रवी आज अगदी जोमात होता रवी व्यवसायने दुकानदार होता किरणा मालाचे त्याचे वडिलोपार्जित दुकान तो आणि त्याचे बाबा सांभाळत असे सांभाळत असे बारावी करून त्याने सरळ बाबाचे दुकान सांभाळ्याला घेतले असा हा रवी रवीचे आजोबा स्वान्त्र्य सैनिक नेहमी रवी देशाबदल च्या गोष्टी ऐकत ऐकत मोठा झाला होता, त्यामुळे त्याला पण देशाबद्दल एक सहानभूती आणि प्रेम त्याच्या मनात होते पण आता मोठा झाल्यावर आजोबाच्या त्याच त्याच गोष्टी त्याला कंटावाण्या वाटू लागल्या होत्या पण गणेशोस्तव म्हणजे त्याचा जिव्हाळयाचा विषय गणेश चतुर्थी च्या तयारी पासून विसर्जना पर्यंत त्याचे सारे लक्ष फक्त मंडपात घुमत असे
गणेश चतुर्थी च्या दिवशी ढोल ताशाच्या गजरात गणरायाचे आगमन मंडपात झाले पाच फुटी गणेशाची सिहांसनावर विराजमान झालेली मूर्ती मंडपात पोहचतात फटक्याची आतेशबाजी झाली पूजे अर्चे सह प्राण प्रतिष्टे सह पूजा भटजी च्या उपस्थिती करून मुख्य स्थानी गणराज विराजमान झाले मंडळा तर्फ अकरा दिवस भरघोस मनोरंजनाचे कार्यक्रमही ठेवण्यात आले होते.सगळे कार्यकर्ते आणि बाकी ची मंडळी आरती करण्यासाठी सज्ज झाली मंडपाच्या बाहेर मोठे स्पीकर लावण्यात आले होते ज्याचा आवाज दूर पर्यत पोहचू शकतो माईक द्वारे आरती म्हण्यात आली सगळ्यांना बुंदीच्या लाडूचा प्रसाद वाटण्यात आला . मंडळाची माणसे एकाच प्रकारचे कपडे आणि फेटे बांधून रुबाबात वावरत होती. मंडप रोषणाई ने भरून गेला होता कार्यक्रमाची जाहिरात आणि शुभेच्छा चा फलक मंडपा बाहेर असा लावला होता कि येणाऱ्या जाणाऱ्यांची सहज अशी नजर लगेच पडावी हे सगळे करण्याचे एकच कारण आपलेच मंडळ सगळ्यात भारी असावे ह्या त्यामागचा हेतू.
प्रथम दिवशी फॅन्सी ड्रेस स्पर्धा ठेवण्यात आली होती \सायंकाळी ७.३० वाजता स्पर्धा सुरू होणार होती ७ वाजता बाप्पाची आरती करण्यात आली रवी वर सगळी कार्यक्रमाची धुरा होती आरती संपे पर्यंत स्पर्धा पहाण्यासाठी भाग घेण्यासाठी गर्दी जमली आणि एकदाची स्पर्धा सुरु झाली एक एक करून बाल कलाकार मंचावर येऊन आपले सादरीकरण करत होते कोणी गबर सिंग झाला होता तर कोण आर्ची तर कोण जेम्स बॉण्ड अशे विविध वेशभुषे सह बोलक्या आवाजात संवाद फेकत कार्यक्रम पार पडला आणि सगळ्या कार्यकर्त्यानी मंडपात झोपी जाण्याचे ठरवले सगळे झोपी गेले रवी हि झोपी गेला एवढ्यात त्याच्या कानावर टक टक असा जोरात आवाज आला तो धडबडून जागा झाला आणि त्याने चार हि बाजूनी पहिले पण त्याला काही दिसले नाही त्यावर तो गप्प झोपी गेला
दुसऱ्या दिवशी सकाळी बाप्पा बरोबर सेल्फी घेऊन मंडळा च्या लोकांनी बाप्पा सोबत चे फोटो सोशल मीडिया वर अपलोड केले त्याच दिवशी लोकांच्या दर्शना साठी भली मोठी रांगा लागल्या होत्या तेव्हड्यात तिथे एक गाडी येऊन मंडपा बाहेर थांबली आणि सगळे कार्यकर्ते धावत गाडी पाशी केले गाडी तुन एक व्यक्ती उतरली पेहराव्यावरून धनाधीश वाटत होती कार्यकर्त्यांनी वाट काढत त्याना बाप्पाच्या चरणा शी नेऊन आशीर्वाद मिळवला रांगेत उभे राहिलेले कुजबुजू लागले पण नंतर त्यांना कळे कि त्या व्यक्ती ने कार्यक्रम साठी भली मोठी देणगी दिली होती आणि त्याचा फोटो बाहेर लावला होता त्याच संध्यकाळी ऑर्केस्ट्रा चा कार्यक्रम होता कार्यक्रमची सुरवात गणरायाच्या वंदनाने झाली मग मात्र एक एक फिल्मी गाण्यांनी परिसर दणाणून गेला दुसऱ्या दिवशी हि सगळे कार्यकर्ते दमून भागून सगळे मंडपात झोपी गेले रवी हि झोपी गेला काही वेळेत रवीचा डोळा लागला होता पण त्याच आवाजाने तो परत आदल्या दिवशी प्रमाणे तसाच जागा झाला त्याने पहिले कि त्याचे सहकारी मित्र गाढ झोपेत आहेत हा काय प्रकार आहे हे त्याच्या समजण्याच्या बाहेर होते
तिसऱ्या दिवशी हि तोच प्रकार घडला त्याने तसेच उठून सगळ्यांना उठवले व ऐकण्यास सांगितले पण त्याच्या खेरीस कोणालाच तो आवाज ऐकू येत नव्हता सगळ्यांनी त्याला वेड्यात काढत झोपी गेले पण रवी चे मन चलबिचल झाले घर जवळ असल्याने तो घरी परतला पण त्याच्या मनात तेच विचार चालत होते सांगणार को
णाला म्हणून तो गुपचूप झोपी गेला
असेच प्रत्येक दिवशी कार्यक्रम होत गेले .पांचव्या दिवशी फिल्मी साँग डान्स स्पर्धा ठेवली होती. रात्री नऊ वाजता स्पर्धा सुरु होणार होती. स्पर्धे साठी खास टीव्ही वर गाजत असलेल्या कार्यक्रमाच्या परीक्षकाला बोलवण्यात आले होते आणि त्याच्या येण्याची अशी काहीजाहिरात बाजी करण्यात आली होती कि सातलाच काहींनी खुर्च्या बळकावल्या होत्या. आठपर्यंत मंडप पूर्ण भरून गेला होता. साडे आठ वाजता एक गाडी येऊन मंडपा बाहेर थांबली तसे सगळे कायकर्ते गाडी पाशी केले आणि त्या मधून उतरलेल्या त्या परीक्षकाला बाप्पा पाशी नेले त्याने लांबूनच हात जोडले त्याच्या खाण्याची व्यवस्था करण्यात आली होती महागडा पिझ्झा आणि पेय मागवण्यात आले होते नऊला निवेदकाने म्हणजे रवी ने परीक्षकांची ओळख आणि पुष्पगुछ देऊन स्पर्धा सुरु होण्याची ललकारी दिली. डॉल्बीच्या आवाजात एकएक करून स्पर्धक आले आणि स्पर्धा रंगात आली. काही प्रेक्षक नाचत होते. काही शिट्या मारत होते. अखेर साडेअकराला स्पर्धा संपली. निकाल जाहीर करण्यात आला बक्षीस देऊन परीक्षक आणि इतर लोक आपल्या आपल्या घरी परतली मंडप खाली झाला. थकूनभागून मंडळाची माणसे तिथेच झोपी गेली रवी ने हि बाप्पाला सांगडे घालून तिथेच झोपी गेला आणि त्याचा डोळा लागला मंडपात सगळीकडे शांतता पसरली.मंडपात रोषणाई चालू होती मंडपाच्या दुसऱ्या बाजूला काळोख होता एवढ्यात रवीला काठीचा आवाज आला. रवी ने डोळे उघडले आणि त्याची नजर त्या दिशेने गेली आज काय तो सोक्षमोक्ष करायच ह्या हेतूने रवी उभा राहिला हि कोणाची तरी मस्करी असेल असे ठरवून त्याने त्या दिशेने वाट धरली त्या काळोखातून एक व्यक्ती प्रकाशाच्या झोतासह येताना रवीला दिसली...
रवी ने त्या दिशेने पाहात म्हटले "कोण रे तिकडे झोपायलाही देत नाही पहिलीच दमलो आहोत आणि टॉर्च का मारतो "?
तेव्हड्यात खणखणतीत आवाजात ती व्यक्ती बोलली "माझी झोप उडवून तुम्ही शांत झोपाल."?
"आम्ही तुमची झोप उडवली कोण आहेस तू"?
"मला नाही ओळखलं रवी असे म्हणत ती व्यक्ती प्रकाश्याच्या जोतातून समोर आली लाल पगडी .माथ्यावर टिळा तेजस्वी डोळे चुपकेदार मिश्या पांढरा सदरा आणि धोती आणि अंगरखा हातात काठी घेऊन उभी होती मी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. माझ्या विचारांची तुम्ही झोप उडवली.
"आम्ही... आणि लोकमान्य तुम्ही काहीपण. हा कुठे होता फॅन्सी ड्रेस कॉम्पेटिशन ?आणि रवी हसू लागला
हस जोरात हस मी माझ्या बदल काही माहित सांगितली तर तू म्हणशील आज काल तुमच्या गूगल वर सगळी माहिती भेटते माझी ओळख मी कशी हि सांगितली तरी तुमचा विश्वास नाही बसणार पण माझी बोली हीच माझी ओळख आहे आणि तू लहान असताना माझी वेशभूषा करून प्रथम क्रमांक पटकावला होतास ना तुच्या आजोबानी त्या साठी तुला बरच तयार केलं होत तुच्या त्या बोबड्या वाणी ला माझ्या संवादाची अशी काय मेळ जुळली कि टाळयांच्या कडकताटात तुचे कौतुक झाले 'स्वराज हा माझा जन्म सिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच "बरोबर ना रवी हे कुठल्या गुगल वर नव्हतं लिहिलेले
त्याचा आवाजातला कणखर पणा पाहून आणि आपल्या बाबतीतली लहानपणची आठवण ऐकून रवी जरा शांत झाला
लोकमान्य त्याना उद्देशून म्हणाले "मी गणेशाचे दर्शन घेण्यासाठी दरवर्षी फिरतो ह्या वर्षी हि आलो होतो.सगळी कडे फिरलो बहुतेक ठिकाणी हेच चित्र दिसले तु युवा आहेस म्हणून विचार केला की तुला भेटावे. तू ह्या गणेश मंडळाचा अध्यक्ष्य ना .."?
गर्वाने रवीने म्हटले "हो मी बघा ना कसा सजवला आहे मंडप आणि मूर्ती सगळ्या मंडळापेक्षा भारी ना."
"भारी... तुम्ही लोकांनी ना ह्या उत्सवाचा खेळ केलाय. आपले मंडळ सगळ्यात कसे वर येईल ह्यासाठी तुमची स्पर्धा असते. त्या विघ्नहर्त्यालासुद्धा तुम्ही ह्या शर्यतीत उतरवलं. काय चालू आहे. काही वर्षांपूर्वी मी हा उत्सव लोकांच्या एकतेसाठी आणि विचारांच्या देवाणघेवाणीसाठी सुरु केला. पण तुम्ही तर त्याचा चेहराच बदलला. मनोरंजनाचे कार्यक्रम तुम्ही ठेवता. पण त्यातून काही चांगले घेणे होतंच नाही त्या दिवशी फॅन्सी ड्रेस कॉम्पेटिशन होत पण त्यात उज्ज्वल भविष्य काहीच दिसले नाही प्रत्येकाने आत्मसात केलेली पात्र खरंच त्याना आयुष्यात दिशा दाखवणारी होती कोणी जवान किंवा पोलीस न होता गब्बर सिंग सारखा गुंड बनला त्या छोट्या मुली ला राणी लक्ष्मी बाई .अहिल्या बाई होळकर आनंदी जोशी ह्याच्या पेक्षा ती आर्ची जवळची वाटली त्याचे ते पाठांतर करताना त्याच्या मनावर काय परिमाण झाला असेल देव जाणे आणि आज तर मी दुरून सगळे पाहत होतो. आत येण्याची लाज वाटत होती . गणेशोत्सवाचा मंडप कमी मद्यालय वाटत होतं. तुम्ही त्या छोट्या पिढीला काय सांगू इच्छिता, असे त्यांना नाचवून आणि असे नाच दाखवून त्यांच्यावर काय परिणाम होणार... चांगला की वाईट... गणेश ही बुद्धीची आणि विद्येची देवता. त्याच्या विचाराचा प्रसार व्हायला नको... आज असेच कार्यक्रम आवडतात असेच तुम्ही म्हणाल. मग बदल कोणी करायचा. सगळेच जण असेच करत राहिले तर माझ्या उद्देशाचे काय होईल. ज्या उद्देशाने मी हा उत्सव सुरु केला, हा फक्त भक्तीचा उत्सव नसून विचारांचा आणि आचरणाचा उत्सव आहे. तुम्ही भावी पिढीने चांगले पाऊल टाकले तर देश घडेल नाहीतर विचार करा... येतो मी..."
टकटक... काठीचा आवाज येत राहिला. लोकमान्य प्रकाशाच्या जोता सह दिसेनासे झाले. रवी मात्र अवाक होऊन पाहत राहिला