लेखणी प्रेम माझं...
लेखणी प्रेम माझं...
प्रिय लेखणीला माझ्या
धार शब्दांची बलवान
लावते मी कधी कधी
ब्रेक जाणूनबुजून
तिच्या एकांती विश्वात
मी मलाच विसरते
म्हणून ब्रेक फक्त तिला
नाही माझ्या विचारांना
r>
धावते माझ्या संगे
थकत नाही ती मुळीच
ब्रेक तिचा फुलस्टॉप
कॉमा घेते ती सांभाळून
अशा प्रेमात ती माझ्या
कि मी तिच्या घायाळ
सांगावं कि वर्णावं शब्दात
अडकलेल्या मला सापडावं