कल्पनांचं सूत्र...
कल्पनांचं सूत्र...




डोक्यातल्या कल्पना
कागदावर उतरतच असतात
की अपयशाचे विचार
सुन्न करून जातात सगळं
मग निरव शांततेचा घेरा
या कल्पनांच्या ठिणगीला
शंकेचं वारूळ पुन्हा
घालतं विळखा शत्रूसारखं
कुणास ठाऊक पुन्हा त्यांचं
होईल का जोमानं आगमन
की राहून जाईल पुन्हा एकदा
यशाच्या रांगेतून पुढं जाणं...