STORYMIRROR

Girish S

Others

3  

Girish S

Others

किमयागार भाग १

किमयागार भाग १

2 mins
132

तो व्यापाऱ्याला म्हणाला मला लोकर विकायची आहे. दुकानात गर्दी असल्यामुळे व्यापाऱ्याने दुपारपर्यंत थांबण्यास सांगितले. मुलगा दुकानाच्या पायरीवर बसला व पिशवीतून पुस्तक काढले व वाचू लागला. मागून एका मुलीचा आवाज आला, 'मेंढपाळ वाचन करू शकतात हे मला माहित नव्हते.' ती मुलगी त्या प्रदेशातील मुलींसारखी होती तीचे काळेभोर केस वाऱ्याने उडत होते आणि डोळे आर्जवी होते. तो म्हणाला 'खरेतर मी पुस्तकां पेक्षा माझ्या मेंढ्यांकडूनच शिकतो.' दोन तासांच्या त्यांच्या बोलण्यातून त्याला कळले की ती व्यापाऱ्याची मुलगी आहे. गावातील जीवनाविषयी चर्चा झाली की गावातील सर्व दिवस सारखेंच असतात. त्याने तीला तो ज्या गावातून, शहरांतून जाऊन आला होता त्याबद्दल सांगितले. तो रोज मेंढ्यांबरोबर बोलत असे, हा एक वेगळाच सुखद बदल होता.

तीने विचारले "तुला वाचायला कसे येते ? ".

 तो म्हणाला सगळे शिकतात तसेच

" शाळेत " 

   त्यावर ती म्हणाली 

" मग तू मेंढपाळ कां आहेस ?".  

उत्तरादाखल तो काही तरी पुटपुटला आणि तीच्या प्रश्नाला उत्तर देणे टाळले. त्याला खात्री होती की तीला त्याची बाजू समजणार नाही. त्याने तीला आपल्या प्रवासातील गोष्टी सांगितल्या त्या ऐकून तीचे चमकदार डोळे विस्फारले गेले, त्यात आश्चर्य दिसत होते. जसा वेळ जात होता तसें त्याला वाटू लागले की हा दिवस संपूच नये, तीचे वडील इतके व्यस्त राहू देत की तीन दिवस थांबावे लागेल. त्याच्या लक्षात आले हा वेगळाच अनुभव आहे, आपल्याला एकाच ठिकाणी थांबावे असे वाटू लागले आहे. या काळ्याभोर केसांच्या मुलीबरोबरचे दिवस किती छान असतील. पण थोड्या वेळाने व्यापारी आला व त्याला चार मेंढ्यांची लोकर द्यायला सांगितले व पैसे देऊन पुढील वर्षी येण्यास सांगितले.


Rate this content
Log in