STORYMIRROR

Sneha Kale

Others

3  

Sneha Kale

Others

खरं प्रेम

खरं प्रेम

1 min
217

सकाळपासूनच तिची चिडचिड सुरू होती तिला सकाळीच पाळी आली.. खूप त्रास होत होता तिला..त्याच परिस्थितीत त्याच्यासाठी नाष्टा बनवला.तिने त्याला सांगितलं की तिला त्रास होतोय तेव्हा तो थंड चेहऱ्याने फक्त आराम कर एवढंच म्हणाला..

तिला वाटलं, तो तिला प्रेमाने जवळ घेईल, अस काहीच झालं नाही..नाश्ता करून तो ऑफिसला निघून गेला..

दिवसभर ही तडफडत राहिली.. काही काळजीच नाही गेला तसच निघून.. काहीच काम करणार नाही मी आज.. फक्त आराम करणार..

संध्याकाळी तिला थोडं बर वाटू लागलं म्हणून उठली.. चहा करून प्यायली आणि जेवणासाठी डाळ भात बनवला.. फोन कडे मात्र लक्ष होत..त्याने दिवसभरात एकदाही फोन केला नव्हता..मग तिने ही ठरवलं त्याच्याशी बोलणारच नाही..

तो घरी आला तेव्हा तिचा मूड बघून काहीच न बोलता फ्रेश होण्यासाठी निघून गेला..

त्याच्यासाठी चहा करून आणला आणि रूममध्ये जाऊन बसली होती. तेवढ्यात त्याने तिच्या समोर तिच्या आवडीचे आईस्क्रीम ठेवले..त्याला माहित होतं पाळीच्या दिवसात तिला आईस्क्रीम खायला आवडत..ते पाहून तिचा राग कुठच्या कुठे पळून गेला..

तो बोलत नसला तरी तिच्या भावना त्याला कळत होत्या..तो आपली काळजी शब्दातून नाही तर कृतीतून व्यक्त करत होता..

खरं प्रेम कधीच कमी होत नाही

नेहमीच ते शब्दांत व्यक्त करण्याची गरज नाही


Rate this content
Log in