कारण ते माझे आईबाबा आहेत .....
कारण ते माझे आईबाबा आहेत .....
"सावी सावी कधी पासून मी तुला हाका मारतोय आणि तू इथं गॅलरी मध्ये काय करतेस आज तुझी सिरियल नाही वाटत टीव्ही शांत मी पाण्याची बाटली न्यायला किचन मध्ये गेलेलो तिथे तु नाही म्हणून तुला हाका मारत होतो
अगं काय झालं मी एवढा बडबडतो आणी तु न ऐकलेल्या सारखी का करतेस काय झालं मॅडम?????
"काही नाही माझा मूड ऑफ आहे म्हणून इथे बसली
"मूड ऑफ का काय झालं"??
"काही नाही तु तुझं काम कर"
"हे तुला असं नाराज सोडून मी जाऊ शकत नाही अगं तुझं हसणं म्हणजे माझा ऑक्सिजन आहे"
"पुरे उगीच मस्का नको मारू थोडा वेळ मला एकटं बसु दे"
पण का????
"हे तु एवढ रुड का बोलतेस माझ्याशी ...
"मी रुड प्लीज राहुल"..
"आज आई-बाबा आलेले तेव्हा तुझ्याकडे पाच मिनिटे नव्हती त्यांना भेटायला.. खुप काम होत ना तुला मग आता नाही आहे का??
"ओ म्हणजे रागावण्याचं कारण हे आहे तर छोटीशी गोष्ट आणी राग एवढा"
छोटीशी गोष्ट बेडरूममध्ये तु लॅपटॉप वर काम करत होतास तिथुन हाॅल मध्ये येण्यासाठी कितीसा वेळ लागतो आणि काम होत तर साधं हाय हॅलो करुन निघुन गेला असतात तर चालल असतं.. ॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅअडलीस मग फोन तरी केला पाहिजे होतास पण ते ही नाही तु कशाला करणार कारण ते माझे आई-बाबा आहेत ना " ते नाही आले तुला भेटायला तुला डिस्टर्ब नको म्हणून"
"कमाॅन सावी उगीच तु हायपर होतेस आणी मला काम होत म्हणून मी नाही आलो आणी त्यात एवढं काय आहे '". हे मी तुच्या आई-बाबा बरोबर वागले असते तर तु गप्प बसला असतास तुझे आई-बाबा इथे राहायला आले की मी दोन दिवस रजा टाकते. कारण त्यांना मी माझे आई-बाबा सारखे मानते. काय आहे ना मुलीने सासरी सासु सासऱ्याना आई वडीलाचा दर्जा दिला पाहिजे, मग तोच न्याय मुलांसाठी का नाही??? त्यांच्या साठी मुलीचे आईवडील सासु सासरेच का राहतात... काय आहे ना, आदर कोणाला करावा हे आपल्या हातात असतं आणि मी उगीच रागावत नाही कारण ते माझे आई-बाबा आहेत.."
