जिंकला तो 'राजा' हरला तो 'प्यादा
जिंकला तो 'राजा' हरला तो 'प्यादा
जिंकला तो 'राजा', हरला तो 'प्यादा'
--------------------------------------------
थोडा वेळ असेल, बोर झाल्यास, हमखास खेळला जाणारा खेळ, बहुतेक सगळ्यानकडेच हा बुद्धीबळाचा पट असतोच असतो!
काळा, पांढरा रंगांची ओळख पण ह्या पटातल्या चौकोनी घरांन कडे बघुन करण्यात येते...
चिऊताईचा घास हसत खेळवत आई भरवताना... हा पट आजुबाजुलाच पडलेला असतो आपले काळ्या आणि पांढर्या रंगाचे हत्ती-घोडे-उंट-वजिर,राजा,प्यादे घेवुन..
थोडे मोठे झाले की आई-बाबा,मित्र, नातेवाइक कोणीतरी सोबत करत खेळ कसा खेळायचा याचे धडे शिकवतात...
कसब लागते हा खेळ खेळताना...
आई-बाबां बरोबर खेळताना लुटुपुटीची लढाई असते...
ते गंमत म्हणुन हरतात व तुला जिंकल्यावर 'राजा'चा मान मिळतो...
तु हसतो व तुझ्याबरोबर ते ही हसतात तु जिंकला म्हणुन...
पण तु हसतो ते हरले प्यादे बनले म्हणुन!
तुझ्या मनातली ही भावना त्यांना कळण्यास खुप वेळ झाला...
लुटीपुटीचा डाव तु नेहमी त्यांना हरवण्यासाठी खेळत गेला...
ते मात्र तुला नेहमी ' तु जिंकणाराच ','संयमी', 'बुद्धीवादी'' ही भावना तुझ्यात रूजावी, तुझ्यातला आत्मविश्वास वाढावा म्हणुन खेळत गेले...
तुझे ते निरागस बालपण कुठेतरी हरवुन गेले...
खेळताना, जगताना नेहमी मी च 'राजा', हरला तो 'प्यादा'
अशी भावना घेऊन जगलास...
आई-बाबांनी विरोध केला की तु त्यांना प्यादा कसे बनवायचे हाच ध्यास घ्यायचा...
पुत्रप्रेमा पोटी ते नेहमी त्यांच्या आकांक्षाना प्यादे बनवत गेले... आणि तू अहंकारी कनक लेवून खोटा 'राजा' बनला.