STORYMIRROR

vaishali vartak

Others

4  

vaishali vartak

Others

जिद्य

जिद्य

2 mins
434

"मला इतक्यात लग्न नाही करायच .मला पण ssc व्हायचय." पण कोण ऐकणार. ? आई व तिच्या दोन बहिणी मामांकडे रहात होत्या. व स्वतःच्या गावात शिक्षणाची सोय नव्हती. मामाकडे रहाणे गरजे होते.   कधी या मामा कडे तर कधी दुस- या मामाकडे. एक मामा त्याकाळी जमखींडी संस्थानात नोकरीस होता. त्यामुळे आर्थिक परिस्थिती छान होती. दुसरे मामा ..पेशाने शिक्षक .. त्यांची मुले शिकत होती. त्यांच्या बरोबर रहात असल्याने आईला शिकण्यात गोडी झाली होती.   दुस-या दोन बहिणींना तेवढी शिक्षणाची आवड नव्हती.. कल पण नव्हता. पण तसे हिचे नव्हते. पण मामी मंडळींना पण 3/3 भाच्या घरात तसेच स्वतःची पण 3/4 मुले त्या मुळे जशी स्थळे येता बहिणींची लग्ने उरकलीत. आणि स्वातंत्र्या पूर्वी चा काळ तेव्हा मुलींचे शिक्षण गौण मानले जायचे. वयाच्या 17/18 व्या वर्षी लग्न होत. तसेच आई चे झाले .लग्न झाले ..सासरी आली. सासरी पण आर्थिक परिस्थिती बेताची ..मील गिरणीत वडिलांची नोकरी. घरात आई बायको बहिण व एकच कमविणारे. पण काळाची गरज तसेच आईची शिक्षण आवड जिद्द बाबांना समजली .त्यांनी तिला शिक्षणाची सुरूवात करण्यास त्यावेळी व फा. म्हणजे व्हर्नीक्युलरा फायनल परीक्षा असे .तिला बसविले. आणि ती परीक्षा देता शाळेतून त्या वेळी नोकरी मिळत असे. ती परीक्षा तिने यशस्वीपणे पार केली. नुसती तिनेच नाही तर नणंदेस पण द्यायला लावली. ती म्हणायची", तू शीक बाई .माझे नाही झाले पण तू शीक .शिक्षण संसारात कामास येईल. स्वतःच्या पायावर आपणास उभे रहाता आले पाहिजे. "  एवढेच नव्हे आजु बाजुच्या समवयस्क बायकांना पण ती सांगायची. शिक्षण महत्त्व समजवायची.   तिने कुटुंबास हातभार लावण्यासाठी शिवण पण शिकली जेणे करुन चार पैसे कमवता येतील . व शिवण शिक्षका म्हणून पण शाळेत नोकरी मिळेल .आणि तेच झाले. शिवण शिक्षिका म्हणून प्रायव्हेट शाळेत लागली. एकि बाजूस म्युनिसीपालटी शाळेत अर्ज करत होतीच. व तिच्या जिद्यीस यश आले. शाळेत नोकरीस लागली. पण शिकवत असता शालेय शिक्षणासाठीपुण्यास दोन वर्षाचा कोर्स चालायचा. जेथे रहात होती ...त्या संसारच्या शहरात मराठी माध्यम नसल्याने तिला पुण्यास जाणे भाग होते. व त्या कोर्सने नोकरीत पुढेप्रगतीची संधी मिळवण्याच्या कामाची होती.   शेवटी आई बाबांनी एकमते आईला पाठविण्याचे ठरविले. अर्थात आजुबाजुचे लोक म्हणत काय बाई आहे मुलांना सोडून शिकायला जात आहे. अहो बाहेरचे काय नातलग पण बाबांना म्हणाले की कशाला पाठवतोय.पुढे डोक्यावर चढेल. हो लोकतर बोलणार च पण ते दोघे विचाराने खंबीर होते. ती पूण्यास जाऊन कोर्स पूर्ण करुन आली.  पुढे मुले मोठी झाली. मुलगा ssc झाला . तिची मनातील इच्छा आजून बळकावली . तिने बाहेरून s s c चा फाॕर्म भरुन मुलाच्या सिलेबलचा वापर करुन ती s s c झाली. जिद्द काय ती तिने दाखविली. पुढे सिनियर पि टी सी होऊन म्युनिसीपालटी तील शाळेत प्रिन्सीपल म्हणून नोकरी करत निवृत्त झाली. मी शिकणार ही मनीची जिद्द . तिने गरीब विद्यार्थ्यांना शिकवून विद्या दान केले .जणुशिक्षणाचा वसाच घेतला होता.  आयुष्याच्या शेवटा पर्यंत तीचे व पुस्तकाचे नाते अतुट होते. जिद्द म्हणजे काय आम्ही तिच्यात पाहिली व तिच्या कडून शिकलो. आज माझी जी लेखणी आहे ती ..तिचेच वरदान आहे. 


Rate this content
Log in