vaishu Patil

Children Stories Drama Inspirational

3  

vaishu Patil

Children Stories Drama Inspirational

जाहले परिपूर्ण मी..!

जाहले परिपूर्ण मी..!

5 mins
304


     रोज रोज तेच काम .. सकाळी लवकर उठा , डबे बनवा ,मुलांना तयार करा ... घरची काम आवरा ...तोवर यांच्या फर्माईश वर फर्माईश ...मम्मी , आज हे बनवतेस का गं ? तोवर लहान झालीत की मोठ्यांची मागणी ... जरा काहितरी चमचमीत बनवतेस का गं जेवायला आज ?

पण मला कोनी विचारतं का तरी कधी , की तू दिवसभर कामात असतेस , दमली असशील ... काही मदत हवेय का ?...उलट वरून मलाच बोलायला मोकळे , काय कामं असतात तुला दिवसभर ..?


रीमा .. किचनमध्ये होती ... आज जाम संतापली होती ती .. तिच्या दोन लाडक्या मुलांवर नि नवरोबांवर .. आतून भांड्याच्या आदळा आपटीचा आवाज तर ऐकू येत होता ... तोंडाचा पट्टा देखील चालू होता .. पण त्याच्याबरोबर ...किचनमधून खमंग वास पण दरवळत होता .. या तिघांचं लक्ष तिच्या बडबडण्याकडे कमी नि खमंग वास कशाचा येतोय .. कोणता पदार्थ बनतोय याकडे जास्त होतं ...


तसंही या बाप-लेकींना तिला मुद्दामहून चिडवण्यात जास्त मजा यायची ...आजही तेच झालं होतं .. रोजच्याप्रमाणेच आजही रीमाने आपली सगळी कामं आवरली होती ...पण आजची तिची काम करण्याची गडबड काही औरच होती .. पटापट कामं आवरून कधी नव्हे ती आज तैयार झाली होती ...एवढ्या वर्षात तिने स्वत:साठी अस काही केलंच नव्हतं .. पण आज तीने ठरवलं होतं ..स्वतःसाठी वेळ द्यायचा .. कापडातून मस्त डार्क गुलाबी रंगाची , सोनेरी काठ असलेली तिच्या आवडीची साडी बाहेर काढली , हो ..ती साडी तिला तिच्या ह्यांनी घेऊन दिली होती ना .. ,लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाला ..म्हणून रीमाला ती साडी खूप आवडायची ..


साडीवर मॅचिंग ब्लॉउझ , मॅचिंग लिपस्टिक , हातात बांगड्या .. भांगात कुंकू .. कपाळावर अगदी चंद्रासारखी उठून दिसेल अशी छोटीशी नाजूक टिकली ...बघणारा पाहताक्षणीचं प्रेमात पडावा असं ते सोज्वळ रूप होतं तिचं ...


ती यांचीच वाट बघत होती, तिच्या दोन्ही मुली केव्हा एकदा शाळेतून घरी येतायत आणि तिला घट्ट बिलगुन म्हणतायत " happy birthday mumma " love u ..आणि नवरोबा येऊन, एकदातरी माझ्या साडीची नि माझी स्तुती करावी ..." आज तू खूप छान दिसतेयस ,एवढं तरी म्हणावं ? पण छे ! यातलं काही घडलंच नाही ..रीमाच्या सर्व स्वप्नांवर पाणी पडलं . कारण मुलं शाळेतून आलीत , नवरोबा ऑफिसमधून आले , पण रीमाला त्या तिघांपैकी कोणीही बड्डे विश नाही केलं ... बिचारी सकाळपासून अवरावर करत होती ... पूर्णपणे हिरमुसली गेली ... पण तिला कुठे माहीत होतं त्या तिघांच्या चुप्पीमागे खूप मोठं गोड सरप्राईज दडलं होतं ...


ती बिचारी स्वतःलाचं दूषणं देत झटपट गेली निघून किचनमध्ये , तसंही तिला खूप वाईट वाटलेलं ... पण जरी मुलांनी , आणि नवऱ्याने जरी तिला बड्डे विश नसलं केलं तरी ती सर्वांसाठी स्पेशल खायला बनवणार होती , ते ती थोडीचं कॅसल करणार होती ...कितीही केलं तरी तीचं जीवापाड प्रेम होतं या तिघांवर ....आदळआपट चालूचं होती ,, एवढं मी करते यांच्यासाठी पण इथं माझी पडलेयचं कोणाला ... असं काहीसं पुटपुटत होती ...

तिचं किचनमधलं काम संपलं होतं , खाऊ तयार होता ... पण आज तिला खूप वेगळं जाणवलं ...रोज शाळेतून आल्या आल्या , दंगा करत ,मम्मी काय बनवलं आहेस आज खायला असं ओरडतचं किचनमध्ये येणारी मुलं ,आज बनवून झालं तरी अजून कशी आली नाहीत याचं खूप आश्चर्य वाटलं तिला ...


नक्कीच .." दाल मे जरूर कुछ काला हें " असं म्हणत ती हॉल मध्ये आली .. हॉल मध्ये पण कोणी दिसेना म्हणून ती बेडरूम मध्ये गेली ..की ते तिघेजण इथेचं असतील ...पण ती बघते तर बेडरूममध्ये पण कोणी नसतं .. आतापर्यंत तिचा सगळा राग शांत झालेला असतो ...कितीही केलं तरी" मायेची वात्सल्य मूर्ती आई " ती किती वेळ रागावून राहील आपल्या लेकरांवर ...


तिने इकडेतिकडे बघितलं कोणीचं कुठे दिसेना ...ती विचार करू लागली ...असे कसे हे तिघेजण कुठे गेले मला न सांगता ... असं कुठे केव्हांच जाणार नाहीत .... हा विचार करत असतांनाच तिला समोर बेडवर पांढऱ्या गुलाबी रंगाची एक पिशवी दिसली ...त्यात काहीतरी होतं ... ती त्या पिशवीजवळ गेली ...आत काय आहे हे बघत असताना प्रथम तिच्या हाताला एक कागद लागला ....ते एक कार्ड होतं जे तिच्या दोन्ही चिमुकल्यांनी मिळून बनवलं होतं . फिक्कट गुलाबी रंगाच्या त्या कार्डशीट कागदाच्या कार्डवर दोन्ही मुलांच्या नाजूकशा हाताचे ठसे होते . आणि आत लिहिलं होतं ...


"आकाशातील सूर्य जसा .. तशी तू आमच्यासाठी ..

वेलीवरचा सुगंधी बहर जसा ...तशी तू आमच्यासाठी ...

पांघरूणातील उबदारपणा .... तशी तू आमच्यासाठी ...

पोळीभाजीतील चविष्ट रुचकरपणा ...तशी तू आमच्यासाठी ..." ❣❣

आणि या कवितेच्या ओळींखाली मोठ्या शब्दांत लिहिलं होतं ...

I Love U Mumma ... God bless u, Stay always with us ... 

          From - पापा , राही आणि रोहित ...😊☺😙


हे सगळं अगदी अनपेक्षितपणे बघून रिमाला अगदी भरून आलं ... मघापासून ती या तिघांना नको नको ते बोलली ,पण हे तिघे तर तिच्यासाठी सरप्राईज गिफ्ट तयार करत होते ... आपोआपच मायेचे वात्सल्याचे थेंब तिच्या डोळ्यातून झिरपू लागले ....


तरी अजून एक गोष्ट तिने उघडून बघितलीचं नव्हती ... त्या पिशवीत काय होतं ते ...डोळे पुसत पुसतचं तिने ती पिशवी उघडून बघितली , आणि अगदी विस्फारलेल्या नजरेने बघतचं राहिली .... त्यात सूंदर अशी जरीकाम केलेली नाजूकशी मघमली साडी होती ... तिने ती साडी उचलली नि मायेने आपल्या उदराशी कवटाळली ... तिला समजतचं नव्हतं की या क्षणाला तिने कसं रिऍक्ट व्हायचं , हसू की रडू अशी अवस्था झाली होती तिची ...

त्या साडीतही एक कागद होता त्यावरही काहीतरी लिहिलं होतं ..


प्रिय रिमा...

माफ कर, तुला आम्ही तिघांनी असं सतवायला नको हवं होतं .. आम्हांला माहीत होतं की तू आम्ही तुला केव्हा बड्डे विश करतोय याची वाट बघत होती ... पण आम्ही ते जाणूनबुजून नाही केलं ... तुला वाटलं आम्ही विसरलो ...पण मग हे गोड सरप्राईज तुला देऊच शकलो नसतो ... आशा आहे की तुला आमचं दिलेलं गिफ़्ट आवडलं असेल ..

तुझाच,

तुझ्या दोन गोड मुलांचा पप्पा...

शार्दूल


हे ती वाचून संपवते ना संपवते तोच तिची दोन्ही मुलं तिला पाठीमागून येऊन घट्ट बिलगतात ... Happy birthday mummy असं म्हणत तिच्या दोन्ही गालावर गोड गोड पापा देतात ... तेवढ्यात रोहित बोलतो , चल ना गं मम्मी ... मघापासून किचनमधून जेवणाचा एवढा छान वास येतोय , कित्ती भूक लागलेय आम्हाला ... तुला सरप्राईज द्यायचं म्हणून तिघेपणं आम्ही त्या पडद्यामागे लपून बसलो होतो ....मला माहितेय तुला आमचं गिफ्ट खूप आवडलं आहे .. आता आम्हाला पण तू काय बनवलं आहे ते खायचं आहे ...आणी पुन्हा पप्पांनी आणलेली नवी साडी घालून बाहेर पण न्यायचयं ना तुला फिरायला ...


हो रे माझा राजा म्हणत, रिमा उठली ....चला तुम्हा सगळ्यांच्या आवडीची बासुंदी-पुरी बनवली आहे, वाढते असं म्हणत तीने समोर उभ्या असलेल्या शार्दुलकडे एक लाडिक कटाक्ष टाकला ... गिफ्ट आवडल्याची पोचपावती म्हणून ..


आणि मनात एक समाधान घेऊन ... अजून काय हवं मला सोन्यासारखी दोन मुलं , काळजी करणारा नवरा ... खरंच ...

"जाहले परिपूर्ण मी ... जाहले परिपूर्ण मी ..."


Rate this content
Log in