जादूई दुनिया
जादूई दुनिया
रमा आज खूप खूश होती!
मैत्रिणी नेहमी वेगवेळ्या गंमती जंमती त्या त्यांच्या आई-बाबांबरोबर वेगवेगळ्या देशात फिरून आल्यावर सांगत असतात!
तशा गंमती जमती आता तिच्याकडेही सांगायला आहे! हो आता माझ्याकडेपण आहेत गंमती जंमती सांगायला!
ती अनाथ आश्रमात रहात होती.. १० वर्षाची झालीतरी ही तीला तीच्या आई-बाबांबद्दल काहीच माहित नव्हते..
शाळेतल्या मैत्रिणी तीला नेहमी चिडवायच्या अनाथ आहे, तुला आमच्यासारखे आई बाबा नाही, तुला आमच्यासारखे दुसर्या देशात फिरायला नाही मिळत! आम्ही बघ आमच्या आई बाबांवरोबर कसे नेहमी फिरायला जातो, खायला बाहेर जातो!
तीची दुनिया तीच्या मैत्रिणीपेक्षा खूप वेगळी होती!
अनाथ आश्रमात ती ज्या राहत होती ते अनाथ आश्रम वेगळ होत! तीथली शिकवण वेगळी होती! शानशौकीच्या गोष्टी, बाहेर फिरण, उगाच पैसे खर्च करणे हे उचित मानले जात नव्हते!
यामुळे क्षणीक वाईट वाटले तरी ती तीच्या दुनियेत खूश होती!
एकदा तीने आश्रमातील दिदींना विचारले होते जादू म्हणजे काय? ती कशी असते? याने कोणाचे नुकसान होते का? जादू का करायची? वैगरे!
गोष्टीचे पुस्तक वाचुन परी व तीची जादूची छडी वाचली होती, नवनविन चमत्कार कसे घडतात त्याच्या गोष्टी एकले होते!
दिदीने, तीला सांगितले बघ तु आज इथे आहेस ती एक जादूच होती, पण देवाची! ते कसे?
ती जादू, चमत्कार देवाने केला होता, आज कोणालाच माहित नाही, तुझ्या आई बाबांची ओळख..
भूजच्या भूकंपात तुझी आई एका ठिकाणी मृत सापडली, मलव्यातून काठतांना, तेव्हा तू तुझ्या आईच्या पोटात सुखरूप असलेली दिसली डॉक्टरांना!
मग तुला त्यांनी तुझ्या आईच्या पोटातून बाहेर काढले! तुझ्या बाबांचापण शोध घेतला पण नाही लागला..
तुझा सांभाळ करायला आमच्याकडे पाठवले! व आम्ही तुला स्विकारल, तुझे नाव रमा ठेवले!
त्या मुळे तुझ्या आई बाबाचे नाव तुला नाही, आडनावपण नाही, हे आश्रम तुझे घर, आम्ही सगळे तुझे भाऊ बहिण!
व बघ कशी छान आहेस तू, सगळ्यांची आवडती!
तुम्ही रोज नवीन नवीन चमत्कार बघतान आपया आश्रमातील दवाखान्यात, मरणाला टेकलेले कसे आपल्या प्रमाने, औषधाने बरे होतात!
ज्यांना हात नाही त्यांना जादुसारखे वाटणारे कृत्रिम हात लावले जातात, आधी दुसर्यांवर अवलंबुन राहणारे हात आल्यावर किती खूश होतात आपल्या स्वतःच्या हाताने काम करतांना, बदलणार आयुष्य त्यांना जादू सारखच वाटते!
पाय नसणार्यांना पाय लावले जातात, डोळे नसणार्यांना डोळे!
हो की नाही आपण दुसर्याच्या जिवनात जादू सारखा आनंद पसरवतो!
तु नाही का तुझ्या वर्गातल्या शालुला आधार दिला तीच्या आईचे निधन झाले होते व तीचे बाबा तीला सोडून पळून गेले होते!
तुझ्यामुळे तीपण तर आता आपल्यासोबत आश्रमात राहते ह्या जादूयी दुनियेत!
लक्षात आल का तुझ्या आपल्या जादुई दुनियेची गंमत जंमत?
तुझ्या मैत्रिणंसारख दुसर्या देशात फिरायला जाऊन केलेल्या गंमती जंमती सांगण्या पेक्षा तुझ्याकडच्या गंमती जंमती बघ कश्या आहेत ते? किती जादुई आहेत ते?
हो, आज मी खूप खूश आहे, माया कडेपण सांगायला खूप खूप... खूप खूप गंमती जमती आहेत... माझी जादुई दुनिया!!
आज किती वर्षांनी रमा मागे वळून बघत होती, तीच्या जादूई दुनियेकडे!!
