इत्थंभूत..(लघुकथा)
इत्थंभूत..(लघुकथा)
"चला हो आजोबा केंव्हा पासुन सांगतोय तुम्हांला आमच्यासोबत अंताक्षरी खेळायला..ऐकतच नाही आहात तुम्ही." छोटा अंकीत खोटा खोटा राग करत आजोबांना सांगत होता. "अरे बाळांनो दुपारी जरावेळ पडावं ऊन किती आहे बाहेर,आराम घ्यावा थोडा." उन्हाळ्याच्या सुट्टीत सारी नातवंडे गावी आली होती.. दिवसभर त्यांचा कल्ला चालु असायचा आज तर काय आजोबांना अंताक्षरी खेळायला सांगत होते.. आजोबा म्हणाले "चला खेळ खेळुया आपण पण अंताक्षरीचा नाही मी तुम्हांला सगळ्यांना एक शब्द देणार त्यावर तुम्ही माहिती सांगायची चल रे अंकीत, बंटी,निशा आणि मिरा कुठंय तिलाही बोलव." आजोबांनी पहिला शब्द दिला महाराष्ट्र मिराने इंग्रजीत फाडफाड माहिती दिली..पण आजोबा म्हणाले "मराठीतून बोलायचे ते पण महाराष्ट्राची इत्थंभूत माहिती सांगायची." "पण इत्थंभूत म्हणजे काय ?" आजोबांनी डोक्यावर हात मारला "अरे देवा इत्थंभूत शब्दच माहित नाही तुम्हांला, इत्थंभूत म्हणजे एखाद्या विषयाची संपूर्ण माहिती."
सर्व नातवंडांसाठी "इत्थंभूत" शब्द नवीन आणि पहिल्यांदाच ऐकलेला होता..
