STORYMIRROR

AnjalI Butley

Children Stories Inspirational

2  

AnjalI Butley

Children Stories Inspirational

इता इता पाणी

इता इता पाणी

3 mins
171

इता इता पाणी, गोल गोल राणी, पैसा झाला खोटा पाऊस आला मोठा... छान होत न! लहान असतांना असे गाणे म्हणने, पावसात भिजणे, कागदाची होडी करणे, चिखल करून एकमेकांवर फेकणे! पैशाचे झाड लावणे, रम्य त्या आठवणी!

पैसा देऊन पाऊस पडत नाही, पैसा खोटा आहे हे तल नसेल कवीला बालमनावर कोरायच?

पैशाचे आपल्या आयुष्यातील महत्व आमच्या लहानपणी नव्हतच मुळी असे म्हणणार्या पिढीतील आम्ही! 

नमस्कार केल्यावर हातावर कोणी पाच पैसे दिले तरी त्याच्या दहा गोळ्या आणून भावंड,मित्रां बरोबर वाटून खाणारे, कमी पडले तर शर्ट, बनियंनच्या टोकाला गोळी बांधून हलक्या दाताचा भार देत, गोळीचे तुकडे करण, चुरा झालातर, अरे अर्धा घेतू, मी देवा शप्पथ उष्ट केल नाही करत, हसत मित्र किंवा समोर जो कोणी असेल त्याच्या तोंडात इवल्याशा हाताने भरवणे, तर कधी तुला जास्त, मला कमी करत लुटीपुटीच भांडण!

दोन बोट दाखवुन बटी, एक बोट दाखवुन कटी!

खेळतांना ना किंमती खेळणी, बाटाची स्लिपर पायात असली तर असली, नसली तर नसली! काहीच एवढे वाटायचे नाही!

पैसा कुठून येतो हे ही माहित नव्हते!

नंतर कळल पैसे कमवायला मेहनत करावी लागते, शेतकर्तायाला शेतात राबाव लागत! शेतकरी नसेल तर काही तरी काम, व्यवसाय करावा लागतं जसे डॉक्टर, इंजिनियर, शिक्षक, आणी हे काम करायचे म्हणजे शिक्षण घ्याव लागत चांगले हे सांगितलेले, शिकायच म्हणजे पैसा आला! 

है असे पैशाचे महत्व सांगणारे गणित, कधी कसे जपायचे व सोडवायचे हे आयुष्याच्या या टप्यावर ही कळले नाही!

आणी आताची ही नातवांची पिढी, हातात स्मार्ट फोन खेळायला व त्यातले पबजी सारखे खेळ, कार्ड वापरून आईबाबाचा आयता पैसा!

आईबाबा ही आपल्याच धुंदीत पैशे कमवण्याच्या पाठी, वर त्यांच्या हाय फाय सोसायटीत गर्वाने सांगणार आज मुलाने इतका पैसा खर्चं केला, ह्याव आणि त्याव!

कारट काय करतं ह्याच काही देण घेण नाही!

बँक बॅलेंन्स संपवले, कर्ज केले, इतर बारा भानगडी नातवाने मग पोलिस घरी आले त्यात पकडून घेऊन गेले! 

मुलाच्या आणि सुनेच्या पैश्याचा नाही झाला काही उपयोग त्याला सोडवायला!

मग आला माझ्याकडे सल्ला घ्यायला, घरात म्हातारा बसून खातो म्हणणारा मुलगा सुन, हाता पाया पडत काहीतरी करानं, तुमचा नातु आहे न करतं!

ते ही त्या पोलिस अधिकार्याने सांगितले म्हणून..

मी त्या पोलिस अधिकार्याला ओळखत ही नव्हतो, पण तो मला ओळखतो असा मुलगा म्हणाला..

काय? मला पटकन ओळख पटत नव्हती, मग त्यानेच सविस्तर ओळख सांगितली, त्याचे वडिल व मी मित्र होत्या त्याकाळातले इता इता पाणी सोबत म्हणणारे, पावसात एकत्र खेळणारे, पैसा झाला खोटा म्हणणारे, एक गोळी वाटून खाणारे!

याच्या वडिलांना शिकायला फी भरायला मदत करणारे!

त्याचे वडिल आता ह्यात नाही पण मुलाला त्यांच्या लहानपणीच्या गोष्टी सांगुन, आपल्या मित्रांची न भेटवता ओळख करून दिलेली, पैसाच सर्व नाही, नाते, मैत्रिचे नाते ह्या पुढे पैसा खोटा ठरतो, हे शिक्षण देणारे, मुलाच्या मनावर बिंबवणारे!चांगले संस्क़ार करणारे!

माझ्या डोळ्यात पाणी आले, आपणच कुठेतरी आपल्या मुलावर नातवावर चांगले संस्कार करायला चुकलो..

वेळ निघुन गेली, ते इता इता पाणी आता डोळ्यात आणून उपयोगाच नाही!

पोलिस अधिकार्याचे आभार मानले, मित्राला रिवार वंदन केले, आपल्या मुलावर योग्य संस्कार केले, व त्या मुलाने ते आचरणात आणले!

नातुला यातुन बाहेर लवकरच काढतो म्हणत, मला वाकुन नमस्कार करत तो परतं दुसर्या मुलाला मुलीला बाहेर पडला व मी याच्या पाठमोर्या आकृतीला जा बेटा आम्ही आमची खरी दौलत नीट सांभाळली नाही, तु आता आम्ही वाया घालवलेल्या मुला-मुलींना तू आता वठणी वर आण!

दोन्ही हात वर करून त्याला भरभरून आशीर्वाद दिला! तशी त्याला माझ्या आशीर्वादाची गरज नाही हे माहित असून सुद्धा!


Rate this content
Log in