akshata alias shubhada Tirodkar

Others

3  

akshata alias shubhada Tirodkar

Others

ह्या गोजिरवाण्या घरात

ह्या गोजिरवाण्या घरात

2 mins
270


 दोन दिवस माहेरी राह्यला आलेली शरयू लॉक डाऊन मुळे घरीच अडकली खूप दिवसांनी माहेरी राह्यची संधी शरयू भेटली होती निवांतपणे मस्त पैकी आई बाबा बरोबर हे क्षण घालवावे असे तिनी ठरवले 

शरयू आई बाबा जेवत होते टीव्ही हि सुरु होता कुठली तरी मालिका चालू होती. गप्पा गोष्टीच्या नादात त्या मालिका कडे कुणाचे लक्ष नव्हते मध्येच जाहिरातीत एका मालिकेचे शीषर्क गीत वाचले सगळ्याची नजर टीव्ही कडे नजर गेली 

"अय्या बाबा हि मालिका परत दाखवणार "

"अगं ती गोजिरवाण्या घरात ना "

"हो आई "

"आवाज वरून ओळखले मी "

"मज्जा येणार परत पाहताना" 

"हो तर एके वेळेची गाजलेली मालिका ती "

"हो बाबा सध्या शूटिंग बंद आहे ना म्हूणन परत दाखवतात" 

"वाह म्हणजे घरात बसून परत आठवणींना उजाळा "

"आठवत, बाबा मी सातवीत असेन तेव्हा हि मालिका सुरु झालेली आणि आई तू साडे आठ च्या अगोदर जेवण वैगरे करून सज्ज असायची आणि बाबा तुम्ही कामावरून येऊन हि मालिका पाहायचा "

"हो तर आपण तिघे हि बसून पाहायचो काय दिवस होते ते "

"हो तर नाही तर आजच्या मालिका कट कारस्थान लफडी ह्यातच कंटाळा येतो पाह्यला ती मालिका कशी आपलीशी वाट्याची... कुठे कारस्थान लफडी नसायच्या एका घरासाठी उत्तम उदारहण म्हणजे हि मालिका मला तर खूप आवडायची आणि आता मी परत बघेन "

"हो आई बरोबर आहे.. त्या मालिकेची गोष्ट वेगळी होती "

"मुळात मालिका ना लांबवू नये आजकाल पाहत तिथे लांबवणी चालू आहे मग ती मालिका लोकांना कंटाळवाणी वाटो अगर नको "

"खरं आहे तुमचं गोजिरवाण्या घराने घर बांधून ठेवली होती "

"चला तर मग आई बाबा आज पासून परत एकदा ते क्षण जगवायचे आपण "

"हिप हिप हुरे फॉर गोजिरवाण्या घरात "



Rate this content
Log in