होरपळलेली धरती
होरपळलेली धरती
उन्हाळ्याचे दिवस होते. सर्व धरती उन्हाने तापलेली होती. झाडांची पाने झडली होती.जनावरे चारा आणि पाण्यासाठी व्याकूळ झाली होती. कुठलाही जीव उन्हाच्या झळयामुळे झाडांच्या सावलीचा आधार शोधत होते. पाखरांचाही चिवचिवाट बंद झाला होता.रहदारी विरळ झाली होती.बारामहिने वाहनारी गोदामाईचे पात्र कोरडे पडले होते. तिच्यातील पाण्याच्या उपशाने तिचे व तिच्या चिल्या पिल्यांंचे अस्तीत्व धोक्यात येवू लागले आहेत. पक्षी अभयारण्य असलेले गोदमाईच्या काठावर उदास दिवस पहायला मिळतात. तिचे पात्र आता कोरडे पडू लागले आहेत. मानवी हव्यास वाढल्यामुळे दुःख जाणवते. जुन्या दिवसांची राखरांगोळी पहायला मिळते.
पक्षांचे अस्तित्व धोक्यात येवू लागले आहेत. सगळी कडून तिच्या पात्राचा उपसा होत आहेत.गोरगरीबांची जीवन दाती आई रोजगार मिळवून देते.त
िच्यावर अनेक कुटुंब जगतात. अशी गोदावरी माय उन्हाळ्यात भकास दिसू लागते. पक्षी जीवाच्या आकांताने, पोटभरण्यासाठी शेतकऱ्यांच्या शेतावर येतात. जलचर जीवांचे अस्तित्व नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.
अशा तप्त उन्हात एक स्त्री रस्त्याच्या कामाला जात होती. रस्त्यावर तप्त डांबर टाकायचे काम होते. त्या कामाला उन्हाळ्यात मजूर मिळत नसे.पण पोटाची खळगी भरण्यासाठी ते काम करावे लागत. अणवानी पायाना त्या तप्त उन्हात कडू लिंबाच्या पाल्याचा आधार होता.ती स्त्री तो पाला तळ पायाला बांधून काम करायची.
तिच्या गरीबीच्या चटक्यापुढे हे चटके ती सहजपणे सहन करत होती.कारण संध्याकाळी तिला आपल्या मुलांसाठी ,
त्यांच्या शिक्षणासाठी हे काम करावेच लागणार होते.होरपाळलेल्या धरती सारखी आई गरीबीच्या परिस्थितीत होरपळलेली होती.